Parineeti chopra and raghav chadha dance video viral in engagement sakal
मनोरंजन

Parineeti Raghav Viral Video: परिणीतीला वाटलं राघव आता रोमँटिक डान्स करेल, पण त्यानं तर डायरेक्ट..

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील व्हिडिओ सध्या बरेच चर्चेत आहेत.

नीलेश अडसूळ

Parineeti Raghav Viral Video: बॉलीवुड जगतात कालपासून एकच चर्चा आहे ती अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची. या मोस्ट पॉप्युलर जोडीचा काल दिल्ली मध्ये आलीशान सोहळ्यात साखरपुडा पार पडला.

या शाही सोहळ्याची बरीच चर्चा झाली. अगदी वऱ्हाडी मंडळींपासून ते भोजनापर्यंत सर्वच गोष्टीने लक्ष वेधले. हा साखरपुडा होईपर्यंत बरीच गुप्तता पाळली गेली. साखरपुडा पार पडल्यावर परिणीती आणि राघव यांनी मीडियासमोर येऊन खास पोज डेट याबाबत जाहीर केले. आता या साखरपुड्यातील बऱ्याच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

त्यापैकीच एक व्हिडिओ म्हणजे राघव आणि परिनिती यांच्या डान्सचा...

(Parineeti chopra and raghav chadha dance video viral in engagement)

परिणीती ही बॉलीवुड मधील एक प्रतिथयश अभिनेत्री आहे तर राघव एक मोठे मातब्बर राजकारणी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सतत एकत्र दिसत होते आणि मग त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाली. अखेर त्यांनी काळ 13 मे रोजी ,मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला.

साखरपुड्यानंतर एका मोठ्या हॉल मध्ये संगीत लावून सर्वांनी डान्स केला. यावेळी राघव आणि परिणिता संगीताच्या तालवार थीरकले. या डान्सचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

राघव आणि परिणीती सोबत त्यांच्या घरचे आणि उपस्थित मंडळीही डान्स करताना आपल्याला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतं. यावेळी राघव आपल्यासोबत रोमॅंटिक डान्स करत असेल असे वाटत असतानाच राघवने आपल्या स्नेहींसोबत थेट पंजाबचा भांगडा नाचायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

या सोहळ्यात सर्वांनी धमाल डान्स केला. यासाठी विशेष संगीताची व्यवस्था करण्यात आली होती. दोन पंजाबी गायक यावेळी आले होते. त्यामुळे या सोहळ्याला एक विशेष रंग चढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या कालवश; राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Latest Marathi News Live Update : अनिल परबांनी अज्ञानाच प्रदर्शन केलंय- रामदास कदम

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

SCROLL FOR NEXT