Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement Venue Guest List celebrities political leader And Other Details sakal
मनोरंजन

Parineeti Raghav: परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यात 'हे' आहेत वऱ्हाडी..

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यात येणाऱ्या पाहुण्यांची यादी जाहीर..

नीलेश अडसूळ

Parineeti Raghav Engagement : बॉलीवुड जगतात आज एकच चर्चा आहे ती अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची. या मोस्ट पॉप्युलर जोडीचा आज साखरपुडा सोहळा दिल्लीत एका आलीशान ठिकाणी रंगणार आहे.

परिणीती ही बॉलीवुड मधील एक प्रतिथयश अभिनेत्री आहे तर राघव एक मोठे मातब्बर राजकारणी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सतत एकत्र दिसत होते आणि मग त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाली. अखेर 13 मे ही थेट साखरपुड्याची तारीख ठरली आणि आज हा शाही सोहळा दिल्लीत रंगणार आहे.

या साखरपुड्यासाठी परिणीती गेली काही दिवस दिल्लीतच राहत आहे. तर तिची बहीण प्रियंका चोप्रा देखील खास या साखरपुड्यासाठी अमेरिकेहून आली आहे. बॉलीवुड आणि राजकारण अशा डॉन बड्या क्षेत्रातील लोकांचा हा साखरपुडा असल्याने वऱ्हाडी ही तसेच दिग्गज असणार आहेत.

(Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement Venue Guest List celebrities political leader And Other Details)

या सोहळ्याला तिच्या घरचे कुटुंबीय उपस्थित असतील या शिवाय बॉलीवुड मधील सेलिब्रेटींनाही आमंत्रण आहे. मग यामध्ये काही मोजक्याच कलाकारांचा समावेश आहे. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार या खास पाहुण्यांमध्ये अभिनेता रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, सानिया मिर्जा, अर्जुन कपूर, मलाइका अरोड़ा, फराह खान, करण जोहर यांचा समावेश आहे.

तर राघव चड्ढा यांच्याकडून राजकीय विश्वातील बड्या नेत्यांना आमंत्रण आहे. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय 'आम आदमी पार्टी'चे काही मोठे नेते ही या सोहळ्याला हजर राहणार आहेत.


तसेच काही राजकीय नेतेही या सारखपुड्यात सहभागी होणार आहेत.

(Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement Venue Guest List celebrities political leader And Other Details)

परिणीतीनं आपल्या पहिल्या वेडिंग फंक्शनला खास बनवण्यासाठी डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या आऊटफिटला पसंत केलं आहे. तर राघव चड्ढा यांनी आपल्या डिझाईनर असलेल्या मामाकडून खास आऊटफिट बनवून घेतला आहे.

या सोहळ्यातील भोजनही खास शाही पद्धतीचे असणार आहे. या सोहळ्यासाठी गेली काही दिवस दिल्लीमध्ये अगदी वेगात हालचाली सुरू होत्या. आणि अखेर आज हा सोहळा रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT