Parineeti-Raghav Wedding: Esakal
मनोरंजन

Parineeti-Raghav Wedding: 'एकमेकांशिवाय जगू शकत नाही..' परिने शेअर केले लग्नाचे काही खास क्षण! फोटो व्हायरल

Vaishali Patil

Parineeti-Raghav Wedding Photo: आप खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये झाला. सर्व नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या सोबतीने त्यांनी जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा कायमचे एकत्र झाले आहेत. आता ज्या क्षणाची दोघांच्या चाहत्यांना आतुतेने प्रतिक्षा करत होते तो आलाय. राघव आणि परिणीती चोप्राने दोघांच्या लग्नाचे काही गोड क्षण चाहत्यांसोबत शेयर केले आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोंना परिने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये ती लिहिते की, 'आम्ही नाश्त्याच्या टेबलवर पहिल्यांदा गप्पा मारतांना, आमच्या मनाला याबद्दल माहिती झालं होतं....मी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मिस्टर आणि मिसेस बनल्याचा आम्हा दोघांना खूप आनंद झाला आहे. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. Our forever begins now!'

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. परिणीतीने या दिवशी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला बेज रंगाचा लेहेंगा पिरधान केला होता. तर यासोबत जुळणारे सुंदर दागिने घातले होते.

तर राघव चढ्ढा त्याच्या मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेल्या हस्तिदंती रंगाच्या ड्रेसमध्ये शोभुन दिसत होता. सुंदर फोटोंमध्ये हे जोडपे खूप गोंडस दिसत आहे. चाहते या दोघांच्या जोडीवर आपली नजर हटवू शकत नाहीत.

परिणीती आणि राघवचे लग्न उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडले. लग्नानंतर त्यांनी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला जोडप्याचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि राजकारणी उपस्थित होते. आता दोघांचे चाहते या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangram Patil: सरकारविरोधी भूमिकेची किंमत? लंडनहून मुंबईत उतरताच डॉ. संग्राम पाटील यांना अटक; प्रकरण चर्चेत

Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात भरतीची संधी!, बारावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

दुसरी खेलो इंडिया बीच स्‍पर्धा : महाराष्ट्राची रूपेरी सांगता; साताऱ्याच्या दिक्षा यादवला रौप्‍यपदक

Viral Video : झाडावर नग्न अवस्थेत चढला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ! टीका सोडून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Bangladesh News: मकर संक्रांती साजरी करू नका, नाहीतर परिणाम भोगा! बांगलादेशात हिंदूंना उघड धमकी, कुणी दिला इशारा?

SCROLL FOR NEXT