Parineeti Chopra and Raghav Chadha's wedding updates pre-wedding party viral video vnp98  Esakal
मनोरंजन

Parineeti Raghav Wedding: परि-राघव आज अडकणार लग्नाच्या बेडीत! हळदी-मेहंदी सोहळ्याला केली फुल धमाल! असा पार पडणार लग्नाचा सोहळा

Vaishali Patil

Parineeti Chopra-Raghav Chadha wedding highlights: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे लव्ह कपल आज कायमचे एकत्र होणार आहेत. उदयपूरमध्ये परिणिती चोप्रा राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत.

दोघांचे चाहते या लग्नाबद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहे. परि-राघवच्या लग्नासाठी लीला पॅलेसला वधूप्रमाणे सजविण्यात आलेला आहे.

23 सप्टेंबर रोजी या जोडप्याचा हळदी, मेहंदी आणि संगीत सोहळा संपन्न झाला असून आता आज हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहे. हा लग्नसोहळा खुपच शाही आणि आगळावेगळा असणार आहे.

या लग्नात बॉलिवूडमधील बड्या स्टार्ससोबतच राजकारणातील दिग्गज नेतेही उपस्थीत राहणार आहे. काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे खासदार संजय सिंह हे दिग्गज देखील लग्नासाठी उदयपूरला पोहचले आहेत.

काल संध्याकाळी जोडप्यांचा संगीत अन् हळदी सोहळा झाला. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या लग्नात सुरक्षेची विषेश काळजी घेण्यात आली आहे. यात बाहेरच्या परिसरात 100 खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तर लग्नाचे फोटो बाहेर जाऊ नयेत यासाठीही विशेष काळजी घेत तेथील लोकांच्या मोबाईल कॅमेऱ्यावर निळा आणि लाल रंगाचा टेप चिकटवण्यात आला आहे.

या शाही लग्नसोहळ्याच्या विधींवर नजर टाकली तर आज दुपारी एक वाजता राघवला सेहरा बांधला जाईल. तर दोन वाजता मिरवणूक निघेल आणि दुपारी 3.30 वाजता दोघांच्या वरमाला होतील.

तर चार वाजता दोघेही सात फेरे घेतील आणि संध्याकाळी 6.30 वाजता परिणीतीची पाठवणी होईल. तर रात्री 8: 30 वाजता उदयपुर मधील हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेस इथे या कपलचे रिसेप्शन असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT