Parineeti Chopra esakal
मनोरंजन

Parineeti Chopra : सासरच्या लोकांनी काय विचार करुन परिणीतीला ते 'गिफ्ट' दिलं असेल बरं?

आता परिणीती ही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Parineeti Chopra : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटो आणि पोस्टमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. परिणीती आणि राघव चढ्ढाचं वेडिंग हा चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय होता. त्या लग्नाला बॉलीवूड, राजकारण, समाजकारण, उद्योगविश्व क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

आता परिणीती ही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ज्यात तिनं तिला दिवाळीच्या निमित्तानं सासरच्या लोकांकडून जे गिफ्ट मिळालं आहे ते तिनं चाहत्यांनाही शेयर केलं आहे. ते खास गिफ्ट पाहून चाहत्यांनीही परिणीतीला प्रतिसाद दिला आहे. परिणीतीनं काही दिवसांपूर्वी तिच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांसोबतच्या ट्रीपचे फोटोही शेयर केले होते. Parineeti Chopra Bollywoo Actress gift frome sister

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

परिणीती ही सध्या तिच्या सासरी दिल्लीमध्ये आहे. यावेळी परिणीतीनं इंस्टावरुन काही फोटो शेयर केले आहेत. ज्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यावरुन तिला आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. तो फोटो एका पाचक गोळ्यांचा आहे. परिणीतीला ते गिफ्ट तिच्या नंदेनं दिलं आहे. ती पोस्ट शेयर करताना परिणीतीनं म्हटलं आहे की, माझ्या नंदेनं हे खास गिफ्ट मला दिलं आहे. मी तब्बल वीस वर्षानंतर ही कँडी खाल्ली असून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Parineeti Chopra Actress

परिणीतीची ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. काहींनी म्हटलं आहे की, हे असं गिफ्ट देण्यामागे सासरच्या मंडळींनी काय विचार केला असेल, काहींनी म्हटलं आहे की, खूपच युनिक प्रकारचे गिफ्ट परिणीती तुला मिळाले आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

परिणीतीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झाल्यास तिचा काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसोबत मिशन रानीगंज नावाचा चित्रपट आला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. तिनं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत उचाई नावाच्या चित्रपटामध्ये चमकली होती. त्यालाही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बिग बी अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.

आता परिणीती प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या चमकीला मध्ये दिसणार आहे. त्यात तिच्यासोबत दिलजीत दोसांज स्क्रिन शेयर करणार आहे. हा एक म्युझिकल ड्रामा असणार आहे. परिणीतीच्या या चित्रपटाची तिचे फॅन्स वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका! १८ रुपयांची सिगारेट थेट ७२ रुपयांवर पोहोचणार? नेटकरी म्हणाले- आता सर्व...

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

नोरा फतेही पुन्हा प्रेमात? फुटबॉलपटूला डेटिंग करत असल्याची अफवा, दुबई आणि मोरोक्कोमध्ये गाठीभेटी सुरु

PCMC Election : पिंपरीतील तीन जागांवर युती काढणार तोडगा; नेत्यांकडून बैठकांचा सपाटा

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

SCROLL FOR NEXT