Parineeti Chopra Bollywood Actress Maldives Trip Photo  esakal
मनोरंजन

Parineeti Chopra Maldives : सासूबाईंसोबत मालदीवला! परिणीतीचं काही खरं नाही, सगळं कुटूंबचं हनीमुनला?

आता परिणीतीचे तिची सासू आणि कुटूंबातील इतर सदस्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

युगंधर ताजणे

Parineeti Chopra Bollywood Actress Maldives Trip Photo : प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राचं सोशल मीडिया अकाउंट पाहिलं की, तिच्या चाहत्यांना फार काही सांगावं लागणार नाही. परिणीतीचं काही दिवसांपूर्वीच आप पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न झाले. त्यानंतर परिणीती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

आता परिणीतीचे तिची सासू आणि कुटूंबातील इतर सदस्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले असून त्यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी प्री वेडिंग फोटोशुटच्या दरम्यान परिणीतीनं चढ्ढा आणि चोप्रा कुटूंबियां दरम्यान अनेक टास्कचे आयोजन केले होते. त्याची सोशल मीडियावर चर्चा होती. क्रिकेटची मॅच हा टास्कला नेटकऱ्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिला होता.

राघव चढ्ढा आणि परिणीतीचे हनीमुनचे फोटोही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मालदीवच्या त्या ट्रीपचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला तिनं गर्ल गँग असे नाव दिले आहे. पोस्ट वेडिंगमध्ये तिनं पुन्हा एका वेगळ्या टास्कचे आयोजन केले होते. या ट्रीपमध्ये परिणीती, परिणीतीची आई, परिणीतीची सासू, नणंद, मेव्हणी या सगळ्यांचा समावेश होता

त्या फोटोला कॅप्शन देताना तिनं म्हटले आहे की, हे आजवरचं सगळ्यात मोठं गिफ्ट. कुलेस्ट थिंग, ज्यामध्ये आई, सासू हे सगळेजण आहेत. खूपच आनंदाचा क्षण आहे. ही सहल आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. ती पार पडली आहे. या क्षणाचा आम्ही पूर्णपणे आनंद लुटला असे परिणीतीनं म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे २४ सप्टेंबर रोजी लग्न झाले. त्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजस्थानमधील उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता. त्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यापर्यत अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

Parineeti Chopra Bollywood Actress Maldives Trip Photo

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT