Parineeti Chopra bollywood Actress opened up : esakal
मनोरंजन

Parineeti Chopra : 'मला खूप मुलं हवीत पण...'! प्रेग्नंसीविषयी परिणीती काय बोलून गेली?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Parineeti Chopra bollywood Actress opened up : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा शाही विवाह सोहळा पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी तिच्या लग्नाला उपस्थित होते. राजस्थानमधील एका मोठ्या पॅलेसमध्ये तिचा विवाह झाला होता.

आप पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न केलेल्या परिणीतीचा नवा अंदाज काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट होत्या. या सगळ्यात परिणीतीच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं प्रेग्नंसीवर वक्तव्य केले असून त्याला चाहते, नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्ष वेधून घेतो आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या वैवाहिक आयुष्य आणि मुलंबाळ यावर केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. यात कित्येक सेलिब्रेटी हे असे आहेत ज्यांना मुलंबाळं जन्माला घालण्याऐवजी ती दत्तक घेणं जास्त सोयीचं वाटतं. अशात परिणीतीची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे. तिच्या त्या प्रतिक्रियेवर तिला चाहत्यांनी सुनावले आहे. हिंदूस्थान टाईम्सनं याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

परिणीतीनं फिल्मफेयरच्या एका मुलाखतीमध्ये तिच्या फॅमिली प्लॅनिंगविषयी विचारण्यात आले तेव्हा तिनं सांगितलं की, मला खूप मुलं हवी आहेत. पण मला एवढ्या मुलांची प्रेग्नंसी काही झेपणार नाही. अशावेळी दत्तक या पर्यायाचा विचार करेन. मला मुलं दत्तक घ्यायला आवडतील. पण जेव्हा मी तेवढयाच संख्येनं मुलांना जन्म देण्याचा विचार करेन तेव्हा मात्र मला ते शक्य होणार नाही.

यावेळी परिणीतीनं तिच्या पार्टनरकडून असणाऱ्या अपेक्षांविषयी सांगितले होते. ती म्हणते मला माझा पार्टनर हा विनोदबुद्धी, विनोदाची जाण असणारा हवा. तो मला हसवणारा हवा. त्यानं माझा आदर करायला हवा. मला समजून घेणारा हवा. यावरुन ही परिणीतीवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

परिणीतीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या चमकिला मध्ये दिसणार आहे. त्यात दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट दोन पंजाबी गायकांच्या आयुष्यावर आधारित असून त्याच्या टीझरला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अमरज्योत कौर आणि अमर सिंग चमकिला या दोन गायकांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT