Parineeti Chopra Sakal
मनोरंजन

Parineeti Chopra: 'तुम्ही वेडे झाले आहात...', राघवसोबतच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणीतीला काय बोलाव सुचेना

परिणीती चोप्राचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती मुंबई विमानतळावर दिसत आहे.

Aishwarya Musale

परिणीती चोप्राच्या लग्नाच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढासोबत तिच्या डेटींगच्या अफवा अलीकडच्या काळात पसरल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, नुकतेच दोघांनी एका क्लोज सेरेमनी दरम्यान एंगेजमेंट केले. अद्याप याबद्दल कोणतीही पुष्टी केलेली माहिती नाही, परंतु याबद्दल जोरदार चर्चा केली जात आहे. आता पुन्हा एकदा विमानतळावर पाहिल्यावर पापाराझींनी परिणीतीला काही प्रश्न विचारले, ज्याचे तिने एका ओळीत उत्तर दिले.

आजकाल परिणीती अनेकदा एअरपोर्टवर दिसते. काल सोमवारीही परिणीती एअरपोर्टवर दिसली आणि पापाराझींनी तिला राघव चढ्ढासोबतच्या लग्नाबद्दल विचारपूस सुरू केली. पापाराझींनी तिला विचारले की ती राघव चढ्ढासोबत कधी लग्न करणार आहे.

लग्नाबाबत सांगा कारण आम्हाला पण कुर्ते शिवून घ्यायचे आहे, असे ते म्हणताना दिसत आहेत. पापाराझींनी अभिनेत्रीला सांगितले की ते मुलीच्या बाजूने असतील. हे सर्व ऐकून परिणीती हसू लागली आणि ती म्हणाली - तुम्ही लोक वेडे झाले आहात. यानंतर परिणीतीने पापाराझींना काही पोजही दिल्या.

खरं तर, अलीकडेच परिणीतीच्या रिंग फिंगरमध्ये एक सिल्व्हर कलरचा बँड दिसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघवचा एंगेजमेंट सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळी फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते असे वृत्त आहे. ऑक्टोबरमध्ये दोघे लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT