Parineeti chopra fist look of saina nehwal released  
मनोरंजन

परिणीती चोप्राचा 'स्मॅश'; सायना नेहवाल बायोपिकचा फर्स्ट लूक शेअर

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भारताची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणा-या परिणीती चोप्रानं नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेयर केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परिणीतीनेही आपल्या इंस्टाच्या अकाऊंटवरुन सायना नेहवालच्या भूमिकेतील फोटो व्हायरल केला आहे. त्याला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

परिणीती पूर्वी श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती. अखेर ती संधी परिणीतीला मिळाली. तिनेही या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. सायनाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे तिने यापूर्वी सांगितले आहे. मागील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. परिणीतीने बॅडमिंटनपटूची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

परिणीतीपूर्वी ही भूमिका श्रद्धा कपूर साकारणार होती. मात्र काही कारणास्तव तिच्या जागी परिणीती वर्णी या चित्रपटात लागली. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना देखील सायनाने एक फोटो शेअर करुन चित्रपटाच्या टीमला आपल्या शुभेच्छा देऊन या प्रवासात मी तुमच्यासोबत असल्याचे म्हटले होते.

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत आहे. नुकताच सायनाने बायोपिकमधील परिणीताचा फर्स्ट लूक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे. सायनाने परिणीतीच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT