Parineeti-Chopra
Parineeti-Chopra 
मनोरंजन

धक्कादायक! अभिनेत्रीला दुखापत, शुटिंगही थांबले!

सकाळ डिजिटल टीम

भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईना नेहवालवर आधारित बायोपिक काढला जातोय. आणि या बायोपिकमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा साईनाची भूमिका साकारत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून परिणीती बॅडमिंटन कोर्टवर घाम गाळत आहे. दुसरीकडे 11 ऑक्टोबरपासून सिनेमाचं शूटिंगदेखील सुरू झालं आहे. मात्र, नुकतीच शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. 

या बाबतचे वृत्त खुद्द परिणीतीनेच ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट करत दिले आहे. ''मला दुखापत होऊ नये, यासाठी साईनाची पूर्ण टीम काळजी घेत होते. पण व्हायचं तेच झालं. पुन्हा बॅडमिंटन खेळण्यासाठी आता मला आराम करावा लागणार आहे,'' असं तिनं म्हटलं आहे.

या आधी साईनाच्या रोलसाठी श्रद्धा कपूरची निवड झाली होती. पण, तिनं दुसरे चित्रपट अगोदर साईन केल्यामुळे हा चित्रपट सोडला. आणि त्यानंतर या रोलसाठी परिणीतीची निवड झाली. साईनाचा रोल साकारण्यासाठी परिणीतीनं वजनही कमी केलंय. हे तिने अगोदर अपलोड केलेल्या फोटोत दिसून येतं. बॅडमिंटनचे प्रशिक्षण घ्यायला सुरवात केल्यापासून ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करते आहे. 

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना परिणीती म्हणाली होती की, बायोपिक करणं आणि त्यातही एका स्पोर्ट प्लेअरवर हा बायोपिक बनत असेल, तर अशा भूमिका साकारणं आव्हानात्मक गोष्ट असते. खेळाडू रात्रं-दिवस कष्ट घेत असतात, तेव्हा कुठे त्यांना त्याचं ध्येय गाठता येतं. चॅम्पियन होणं ही सोपी गोष्ट नाही, हे मला साईनाची भूमिका साकारण्यासाठी घ्याव्या लागलेल्या मेहनतीमुळे समजलं. 

कोणताही खेळ हा सोपा नसतो. खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी सातत्य आणि खूप मेहनत घ्यावी लागते. सध्या मी बॅडमिंटनवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. या चित्रपटाचं शूटिंग संपवून तो पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा निर्माता भूषण कुमार यांचा मानस आहे. 

या अगोदर परिणीतीने 'द गर्ल ऑन ट्रेन' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. साईनावर आधारित या बायोपिकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल गुप्ते हा मराठी दिग्दर्शक सांभाळत आहे. या चित्रपटाची उत्सुकता फक्त साईना, परिणीतीच्या चाहत्यांना नव्हे, तर देशातील बॅडमिंटनच्याच चाहत्यांना लागून राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT