Parineeti Chopra - Raghav Chaddha Engagement Viral Video Esakal
मनोरंजन

Mika Singh च्या गाण्यावर ठेका धरत थिरकले परिणीती आणि राघव चड्ढा.. समोर आला सोहळ्यातला Inside Video

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेता राघव चड्ढा यांचा दिल्लीत धुमधडाक्यात १३ मे रोजी साखरपुड्याचा सोहळा रंगला.

प्रणाली मोरे

Parineeti Chopra - Raghav Chaddha Engagement Viral Video: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे नवे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेत्री आपले होणारे पती राघव चड्ढा यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

तर नव्या व्हिडीओत मीका सिंगच्या लाइव्ह गाण्यावर हे कपल धुंद होत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ भलताच आवडला आहे. चला पाहूया परिणीती -राघव यांच्या साखरपुड्याचा हा व्हिडीओ..(Parineeti Chopra - Raghav Chaddha groove to mika singh live singing )

खास मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीत परिणीती-राघव यांचा साखरपुड्याचा सोहळा चांगलाच रंगला. आणि बॉलीवूड सिंगर मिका सिंगनं आपल्या गाण्यानं हा साखरपुडा चांगलाच गाजवला. मिकानं आपल्या गाण्यावर सगळ्यांनाच थिरकायला भाग पाडलं.

मिकानं आपल्या इन्स्टाग्रामवर परिणीती-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यामध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना 'मिट्टी मिट्टी बोल'च्या तालावर नाचताना पाहिलं जाऊ शकतं.

व्हिडीओ शेअर करत मिका सिंगनं लिहिलं आहे,''बहुत सोणा मुंडा बहुत प्यारी कुडी.., भाई राघव चड्ढा आणि प्रिय परिणीती चोप्रा को बहुत बहुत बधाई''. या व्हिडीओला पापाराझीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे,चाहत्यांनी या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

माहितीसाठी सांगतो की,परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी शनिवारी १३ मे रोजी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये जवळचे कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला. तर कपलनं इन्स्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. याव्यतिरिक्त मीडिया समोर येऊन परिणीती आणि राघव चड्ढा यांनी फोटोही क्लिक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT