Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement Menu Esakal
मनोरंजन

Parineeti Chopra-Raghav Chadha यांच्या साखरपुड्याला पाहुण्यांसमोर असणार पंचपक्वानांची थाळी.. असा आहे मेन्यू..

दिल्लीत मोठ्या थाटामाटात १३ मे रोजी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे.

प्रणाली मोरे

Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement Menu: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्ढा हे दोघे आता आपल्या आयुष्यात एकत्रितपणे एक नवा प्रवास सुरू करणार आहेत. आज दोघांचा साखरपुडा आहे ज्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. साखरपुड्याचा सोहळा दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे.

आज पाच वाजल्यापासून सोहळ्याला सुरुवात झाली तर त्यानंतर साधारण ८ वाजता रिंग सेरीमनी होईल. आज सकाळपासून साखरपुड्याच्या व्हेन्यूचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिथे येणाऱ्या पाहुण्यांची लगबगही आता दिसत आहे.

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात जवळपास १५० लोक सामिल होणार आहेत. ज्यामध्ये कुटुंबिय,मित्रपरिवार आणि राजकीय मंडळीं सोबत बॉलीवूडकरही सामिल होतील. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आधीच दिल्लीत पोहोचला आहे. तर प्रियंका चोप्रा देखील दिल्लीत आली आहे. याव्यतिरिक्त करण जोहर,सानिया मिर्झा यांना देखील निमंत्रण आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील सोहोळ्यात सामिल होणार असल्याची बातमी आहे.

परिणीती हे बॉलीवूडमधील तर राघव चड्ढा हे राजकारणातील मोठं नाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे अर्थातच दोघांच्या साखरपुड्यासाठी सोहोळ्यात सामिल होणाऱ्या पाहुण्यांचा देखील खास पाहुणचार होणार हे ओघानं आलंच.

रिपोर्ट्सनुसार साखरपुड्यात पाहुण्यांच्या खाण्यापिण्याची मोठी बडदास्त राखण्यात आली आहे. मेन्यूमध्ये स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असणार आहे. यामध्ये अधिककरुन भारतीय पदार्थांचा समावेश असणार आहे. बोललं जात आहे की कबाबपासून वेगन अशा सगळ्याप्रकारच्या पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे.

माहितीनुसार साखरपुड्यातील सर्व विधी या शीख रिती-रिवाजानुसार पार पडतील. ज्याची सुरुवात अरदासनं केली जाईल. त्यानंतर अंगठी घालण्याचा कार्यक्रम होईल. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची वाट पाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

Satara ZP Politics : साताऱ्यात झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा बहिष्कार; शंभूराज देसाई-मकरंद पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक', पण भाजपचा मार्ग झाला मोकळा

SCROLL FOR NEXT