Parineeti Chopra_Raghav Chaddha  
मनोरंजन

Parineeti Raghav Chadha: परिणीती चोप्रा, राघव चढ्ढा यांचा साखरपुडा संपन्न; पाहा सोहळ्याचे फोटो

या सोहळ्याला बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.

सकाळ डिजिटल टीम

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढ यांचा साखरपुडा अर्थात एंगेजमेंट सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली. एंगेजमेंट सोहळ्यानंतर परिणीतीनं इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. (Parineeti Chopra Raghav Chadha got Engageed at Delhi Kapurthala house)

गेल्या अनेक दिवसांपासून हे जोडपं चर्चेत होतं. अनेक ठिकाणी हे दोघ एकत्र दिसल्यानं आणि पापाराझींच्या कॅमेरॅत ही जोडी कैद झाल्यानं त्यांच्यामधील नात्याची चर्चा सुरु झाली होती. पण सुरुवातीला दोघांकडूनही याबाबत मौन बाळगण्यात आलं होतं. पण अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

केजरीवाल, मान यांनी लावली हजेरी

दरम्यान, या साखरपुड्याच्या सोहळ्याला परिणीतीची बहिण प्रियंका चोप्रानं देखील हजेरी लावली. ग्लॅमरस लूकमध्ये कारमधून तिचं सोहळास्थळी आगमन झाल्यानं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचबरोबर बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला एकूण १५० पाहुणे हजरे लावणार असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांचे कुटुंबीय काही जवळचे मित्र-मैत्रिणी यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचे समन्वय आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

याच वर्षी उडणार लग्नाचा बार

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे यापूर्वी एअरपोर्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्यानं त्यांच्याबाबत चर्चा तर सुरु होत्याच. पण आज त्यांचा साखरपुडा संपन्न झाल्यानं ते एकमेकांना डेट करत असल्याचंही उघड झालं आहे. आजच्या एंगेजमेंट सोहळ्यांनतर आता याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात ते लग्नबंधनातही अडकतील असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Periods Miss झालेत? हे फक्त प्रेग्नंसी नाही, तर या’ 3 आजारांचे असू शकते लक्षण

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Aaditya Thackeray : "एका झाडालाही हात लावू देणार नाही"; तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक!

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ चित्रपट निराशाजनक, विस्कळित कथेमुळे प्रेमाची जादू हरवली

SCROLL FOR NEXT