parineeti chopra and raghav chadha Sakal
मनोरंजन

Parineeti Chopra: राघव चढ्ढासोबतच्या लग्नाच्या वृत्तावर परिणीती चोप्राने सोडले मौन, लाजत दिली ही प्रतिक्रिया

लग्नाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी आता परिणीती चोप्राने लग्नाच्या बातमीवर मौन तोडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड आणि राजकारण यांचे नाते काही नवीन नाही. चित्रपट स्टार वगळता अनेक सेलिब्रिटींनी नेत्यांशी लग्न केले. स्वरा भास्करनंतर आता परिणीती चोप्राही सेटल होण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार ती लवकरच आप नेते राघव चढ्ढासोबत लग्न करणार आहे. लग्नाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी आता परिणीती चोप्राने लग्नाच्या बातमीवर मौन तोडले आहे.

काल रात्री म्हणजेच 28 मार्च 2023 रोजी परिणीती चोप्रा विमानतळावर दिसली. यादरम्यान तिला लग्नाबाबत विचारपूस करण्यात आली. राघव चड्ढासोबतच्या तिच्या लग्नाबाबत अभिनेत्रीने कोणतेही वक्तव्य केले नाही, मात्र तिच्या लाजऱ्या स्मिताने या प्रश्नाचे उत्तर दिले. लग्नाचा प्रश्न ऐकून परिणीती लालबुंद झाली होती. तिच्या डोळ्यातही चमक दिसत होती. विमानतळावर, अभिनेत्री पांढर्‍या हायनेकसह काळ्या कोट-पँटमध्ये सुंदर दिसत होती.

परिणीतीनेही राघवसोबत एंगेजमेंट केल्याची बातमी समोर येत आहे. AAP खासदार संजीव अरोरा यांनी रूमर्ड कपलचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर ट्विट करून संजीवने लिहिले की, “मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. दोघांनाही प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या तुला हार्दिक शुभेच्छा. संजीवच्या या ट्विटनंतर असे मानले जात होते की दोघे खरोखरच आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवणार आहेत.

परिणीती आणि राघवच्या नात्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा दोघे सलग दोन डिनर आणि लंच डेटवर एकत्र दिसले. त्यांच्या केमिस्ट्रीवरून ते डेट करत असल्याचा अंदाज बांधला जाऊ लागला. मात्र, लोक दोन्ही बाजूंच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT