Parineeti Chopra Sakal
मनोरंजन

Parineeti Chopra: लग्नाच्या अफवांमध्ये मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली परिणीती, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअरच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Aishwarya Musale

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअरच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर सलग दोनदा स्पॉट झाले तेव्हापासून हे सर्व सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येत आहेत.

अफवांदरम्यान, परिणीती बुधवारी रात्री प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिसली. दुसरीकडे, मनीषच्या घरी स्पॉट झाल्यानंतर परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या अफवांना जोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये परिणीती काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपसह पांढरा फॉर्मल पॅंटसूट परिधान करताना दिसत आहे. तिने तिचा लुक मॅचिंग चिक हँडबॅग आणि ब्लॅक हिल्ससह जोडला.

कारमधून उतरल्यानंतर लगेचच अभिनेत्री पापाराझींसाठी पोज देताना दिसली. यादरम्यान ती लाजतानाही दिसली. तसेच पापाराझींनी तिला लग्नाबद्दल प्रश्न देखील विचारले. लग्नाचे प्रश्न टाळण्यासाठी ती पटकन मनीषच्या घरात जाताना दिसली.

त्याचवेळी परिणीतीला मनीष मल्होत्राच्या घरी पाहून चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "मला वाटते की ती पूर्णपणे प्रेमात आहे." आणखी एका चाहत्याने लिहिले, "क्यूट आणि लाजाळू." दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहिले की, ती मनीष मल्होत्राकडे लग्नाचे कपडे ऑर्डर करण्यासाठी आली आहे.'

परिणीती अखेरची अमिताभ बच्चन स्टारर 'हाइट' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती दिलजीत दोसांझसोबत चमकीला या चित्रपटात दिसणार आहे. दोघांनी नुकतेच इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवस आधी ट्विट करणारा समित ठक्कर कोण? रोहित पवारांचा गंभीर आरोप

जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे अपहरण; सात तास अमानुष छळ, थरारक घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ!

Rohit Pawar PC : अजितदादांना अमेरिकेचं जुनाट विमान का दिलं? ८५ तास उरलेले, VSR ला DGCA वाचवतंय; रोहित पवारांचा आरोप

TET Promotion Rules : टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्‍नतीवरून वादंग; शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव, पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात!

'रात्रीच्या वेळी मला एकटीला भेटायला बोलावलं आणि...' अभिनेत्रीला सहकलाकाराने केलेली अश्लील मागणी, म्हणाली...

SCROLL FOR NEXT