parineeti chopra  Sakal
मनोरंजन

Parineeti Chopra: परिणीती चोप्राने राघव चड्ढा सोबत केली एंगेजमेंट? अभिनेत्रीच्या अंगठीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत.

Aishwarya Musale

आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नाच्या अफवांदरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या रिंग फिंगरमध्ये सिल्व्हर बँड घातलेली दिसली. राजकारणी राघव चढ्ढा यांना डेट करत असल्यामुळे ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे.

सोमवारी रात्री परिणीतीच्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत आहे. तिच्या हातातील अंगठी पाहून त्यांनी एंगेजमेंट केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेत्री सोमवारी रात्री सेलिब्रिटी मॅनेजर पूनम दमानिया यांच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली होती. यादरम्यान परिणीतीने जीन्स आणि क्रॉप टॉप घातला होता. परिणीती कॅज्युअल लूकमध्ये खूपच आकर्षक दिसत होती.ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्माईलही दिली.

दुसरीकडे, राघव चड्ढा यांनी पत्रकारांशी नुकत्याच झालेल्या भेटीत आपल्या रुमर्ड वेडिंगवरील प्रश्न चतुराईने टाळले. मात्र, अलीकडेच गायक-अभिनेता हार्डी संधूने परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याला दुजोरा दिला होता. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT