Parineeti-Raghav Esakal
मनोरंजन

Parineeti-Raghav: "देवावरचा विश्वास...", लेकीच्या साखपुड्यानंतर रिना चोप्रा भावुक!

Vaishali Patil

Parineeti Raghav Engagement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढ यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.

एंगेजमेंट सोहळ्यानंतर सध्या या कपलच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या समारंभानंतर, परिणीतीची आई रीना चोप्रा हिने तिच्या लेकीसाठी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी नोट शेअर केली आहे.

परिणीतीची आई रीना चोप्रा यांनी रविवारी सोहळ्याच्यावेळीचा परिणीती आणि राघवचा एक फोटो शेअर करत नव्या जोडप्यासाठी एक सुंदर नोट देखील लिहिली.

रीना चोप्रा आपल्या पोस्टमध्ये लिहितात, "तुमच्या आयुष्यात अशी काही कारणं येतात की ज्यामुळे तुम्हाला देव आहे यावर वेळोवेळी विश्वास बसतो. हे त्यापैकीच एक आहे.... खरोखर धन्य आहे. देवाचे आभार. तुम्ही या कार्यक्रमास आले, आशिर्वाद दिले, त्यांमुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानते."

परिणीतीच्या आईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील त्याच्या एंगेजमेंट सोहळ्याची झलक शेअर केली आहे. फोटोंमध्ये ती तिचे कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत पोज देताना दिसली. हे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी देखील या फोटोंची प्रशंसा करत आहेत.

परिणीती चोप्राने देखील साखरपुड्यानंतर राघवसोबतचे तिचे काही रोमँटिक फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती राघवसोबत वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसली. तर, शेवटच्या फोटोमध्ये दोघेही त्यांच्या अंगठ्या दाखवल्या आहेत. परिणीती कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच इम्तियाज अलीच्या 'चमकिला'मध्ये दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

आजचे पंचांग 7 ऑगस्ट 2026! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ७ ऑगस्ट २०२६

युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

SCROLL FOR NEXT