Parineeti-Raghav Engagement
Parineeti-Raghav Engagement Esakal
मनोरंजन

Parineeti-Raghav Engagement: साखरपुड्याच्या काही तास आधी एकत्र दिसले परिणीती-राघव.. व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण

प्रणाली मोरे

Parineeti-Raghav Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेता राघव चड्ढा १३ मे रोजी संध्याकाळी दिल्लीत धुमधडाक्यात साखरपुडा करत आहेत. साखरपुड्याच्या बातम्या आणि दिल्लीत पाहुण्यांच्या सरबराईच्या दरम्यान आता राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा सोहोळ्याच्या व्हेन्यूवर एकत्र नजरेस पडले. साखरपुड्याच्या काही तास आधीच परिणीती आणि राघव एकदम कडक सुरक्षा व्यवस्थेत सेंट्रल दिल्लीच्या कपूरथला हाऊमधनं बाहेर येताना दिसले.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यां दरम्यान सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सेंट्रल दिल्लीच्या कपूरथला हाऊसमधनं चोख सुरक्षाव्यवस्थेत गाड्यांचा ताफा बाहेर येताना दिसला.

बोललं जात आहे की या गाड्यांमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आहेत. साखरपुड्याच्या काही तास आधीच सोहोळ्याच्या व्हेन्यूमधनं कडक सुरक्षा व्यवस्थेत गाड्यांचा ताफा बाहेर येताना पाहून लोक मात्र हैराण झाले आहेत.(Parineeti-Raghav Engagement video viral from function venue)

मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव चड्डा साखरपुड्याच्या व्हेन्यूवर तयारी चोख पार पडली आहे की नाही हे पाहण्यास गेले होते. आप नेता राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत पाहून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

माहितीसाठी सांगतो की,परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्रीची चुलत बहिण प्रियंका चोप्रा लंडनहून दिल्लीत पोहोचली आहे. तसंच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा देखील सोहोळ्यात सामिल होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात बॉलीवूडचे अनेक कलाकार आणि राजकारणी सहभागी होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या सोहोळ्यात सामिल होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT