parineeti raghav wedding sangeet Couple's FIRST pics from 90s themed party out SAKAL
मनोरंजन

Parineeti - Raghav Wedding Update: 90's च्या गाण्यावर थिरकले परिणीती - राघव, संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल

परिणीती - राघवच्या संगीत सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत

Devendra Jadhav

Parineeti - Raghav Wedding News: परिणीती - राघवच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झालीय. उदयपूरमध्ये शाही थाटात दोघे लग्न करणार आहेत. अशातच परिणीती - राघवच्या संगीत सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.

गायक नवराज हंसने संगीत सेरेमनीला ९० च्या दशकातील अफलातून गाणी गाऊन संगीत सेरेमनीची शान वाढवली. परिणीती - राघव दोघेही या संगीत सेरेमनीमध्ये थिरकताना दिसले.

परिणीती - राघवची संगीत सेरेमनी

परिणीती - राघव सहकुटुंब उदयपूरला पोहोचले आहेत. थोड्याच वेळात दोघांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोघांच्या संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक हंसराज हंस यांचा मुलगा, सुप्रसिद्ध पंजाबी गायक नवराज हंस यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळाला. कजरा मोहब्बत वाला सारख्या बॉलीवूड क्लासिक्स आणि दिल चोरी सदा हो गया आणि गुड नाल इश्क मीठा सारख्या पंजाबी हिट गाण्यांच्या मिश्रणाने त्याने पाहुण्यांचे मनोरंजन केले.

नवराजने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर वधू आणि वर परिणिती आणि राघव यांच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. परिणीती - राघव संगीत सोहळ्याचा कार्यक्रमात धम्माल करताना दिसत आहेत.

असा होणार परिणीती - राघवचा लग्नसोहळा

या शाही लग्नसोहळ्याच्या विधींवर नजर टाकली तर आज दुपारी एक वाजता राघवला सेहरा बांधला जाईल. तर दोन वाजता लग्नाची वरात निघेल. आणि अखेर दुपारी 3.30 वाजता दोघांच्या वरमाला होतील.

तर चार वाजता दोघेही सात फेरे घेतील आणि संध्याकाळी 6.30 वाजता परिणीतीची पाठवणी होईल. तर रात्री 8: 30 वाजता उदयपुर मधील हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेस इथे या कपलचे रिसेप्शन असणार आहे.

परिणीती - राघवच्या लग्नासाठी कडक नियम

आज २४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला आणि द ताज लेक पॅलेसमध्ये हा परिणीती - राघवचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

निक जोनस आणि प्रियंका या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. या सोहळ्याला जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांना मोबाईल फोनची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांनी फोन घरी किंवा जिथे राहण्याची व्यवस्था केली असेल तिथे ठेवून सोहळा अटेंड करण्यासाठी यावे. असे सांगण्यात आले आहे.

मोबाईलमधून वेडिंग फोटो काढणे, शुट करणे याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे वेगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियातून व्हायरल होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT