Pathan Box Office Collection Day 7 Sakal
मनोरंजन

Pathaan Box Office Collection Day 7: 'पठाण' ची घोडदौड सातव्या दिवशी मंदावली! मात्र तरीही कमावला इतक्या कोटींचा गल्ला...

Vaishali Patil

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची सध्या जगभरात हवा आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दररोज आश्चर्यचकित करत आहेत. 25 जानेवारीला रिलिज झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. सात दिवस पुर्ण झाले असूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. सातव्या दिवशीही शाहरुख खानच्या पठाणची मोहिनी कायम राहिली.

पठाणची क्रेझ फक्त भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. पठाण हा 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. फिल्म ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, पठाणने एका आठवड्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर 640 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट जगभरात 8 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे, जो एक विक्रम आहे.

सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पठाण बॉक्सऑफिसवर सुस्तावला आहे. रिपोर्ट्सनुसार, पठाणने सातव्या दिवशी जवळपास 21 कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी या चित्रपटाने सोमवारी 25.50 कोटींचा व्यवसाय केला होता. आठवड्याच्या दिवशी चित्रपटांच्या कमाईत घट होणे हे सामान्य असलं तरी अशा स्थितीतही पठाणने २१ कोटींचा आकडा पार केला आहे.

यशराज फिल्म्सच्या माहितीनुसार, या चित्रपटाने 6 दिवसांत 591 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने भारतात सातवापर्यंत 315 कोटींचा आकडा पार केला. 'पठाण' चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग 50 कोटींहून अधिक होती. 'पठाण'ने पहिल्याच दिवशी 57 कोटींचा व्यवसाय केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT