shah rukh khan Sakal
मनोरंजन

Pathaan: आता बाहुबलीची बारी, शाहरुखचा 'पठाण' बनणार नंबर 1 हिंदी चित्रपट, जाणून घ्या 34व्या दिवसाची कमाई

जवळपास महिनाभरानंतरही 'पठाण' हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' चित्रपट रिलीज होऊन महिना उलटल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

जवळपास महिनाभरानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. मात्र, आता 34व्या दिवशी चित्रपटाची कमाई एक कोटीवर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, पठाणच्या कमाईत ३४ व्या दिवशी किंचित घट झाली आहे. सोमवारी 75 लाखांचा व्यवसाय केला आहे. कमाई कमी झाली असेल, पण पठाणचा एकूण देशांतर्गत व्यवसाय आता ५२६.४१ कोटींवर पोहोचला आहे.

जगभरात या चित्रपटाने एक हजार कोटींचा जादुई आकडा आधीच पार केला आहे. मात्र, हा व्यवसाय ज्या पद्धतीने होत आहे, त्यावरून हा चित्रपट पुढील आठवड्यापर्यंत चित्रपटगृहात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पठाणच्या हिंदी व्हर्जनने रविवारपर्यंत 507.60 कोटींचा व्यवसाय केला होता. आता ताज्या आकडेवारीची भर घातली तर त्याची कमाई 508.45 कोटी रुपये झाली आहे.

अशा परिस्थितीत, बाहुबली 2 च्या ऑल टाइम हिंदी व्हर्जनचा विक्रम मोडण्यासाठी पठाणला फक्त 3 कोटी रुपयांची गरज आहे. अशा परिस्थितीत या आठवड्याच्या अखेरीस पठाण हा विक्रमही गाठेल अशी अपेक्षा आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT