Pathaan Controversy BSP MP On Pathaan Esakal
मनोरंजन

Pathaan Controversy: खासदारांनाच दीपिकाच्या बिकीनीत इंट्रेस्ट! 'तुम्ही आता...'

सकाळ डिजिटल टीम

BSP MP Danish Ali On Pathaan: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटाचा वाद काही शांत होतांना दिसत नाहीये. या चित्रपटातील गाण्यावरुन राजकारणी तसेच काही संघटना यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आता वादाचे पडसाद संसदेतही ऐकू येत आहेत. बसपा खासदार दानिश अली यांनी सोमवारी संसदेत चित्रपटाच्या निषेधाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, देशात नवा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सत्ताधारी पक्षानी केली आहे. पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्यावरुन ते म्हणाले की, जर असचं असेल तर सेन्सॉर बोर्डाची स्थापना का करण्यात आली आहे.

खासदार दानिश अली यांनी दीपिकाच्या फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी लाँन्च करण्याचा संदर्भ देत म्हटले की, "जेव्हा आपल्या देशाची अभिनेत्री फिफा विश्वचषकात फिफा ट्रॉफीचं अनावरण करत होती, तेव्हा आमची ह्रदयं फुलून गेली होती आणि आमचा उत्साहही वाढला होता." मात्र गेल्या काही दिवसांपासून रंगलाही धर्मात विभागलं जात आहे. रंगाच्या नावाखाली चित्रपटांवर बंदी घालण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे.

या चित्रपटाच्या विरोधाबद्दल संताप व्यक्त करताना दानिश अली म्हणाले, “या देशातील अनेक कलाकारांनी देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवली आहे, हे कोणापासून लपलेलं नाही. पण आता या देशात नव्याचं वादाला सुरुवात झाली आहे.

या चित्रपटावर बंदी घालण्याची सत्ताधारी पक्षाची मागणी आहे. तुम्ही सेन्सॉर बोर्ड का स्थापन केले? मला एवढेच सांगायचं आहे की, सत्ताधारी पक्षाचे लोक असोत किंवा कोई उलेमा बोर्ड म्हणत आहेत की शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा हा चित्रपट आला आहे… त्यावर बंदी घातली पाहिजे… चित्रपटांवर बंदी घालण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचं आहे.

पुढे ते म्हणाले, “संसदेत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी भगवा रंग परिधान करून आपली कला दाखवली आणि कदाचित हे कौशल्य पाहून ते आज या संसदेत आहेत. सनातन धर्म एवढा दुबळा नाही की कलाकाराने एकाच रंगाचे कापड घालून कृत्य केलं तर धर्म अडचणीत येईल. किंवा इस्लाम हा इतका कमकुवत धर्म नाही की चित्रपटातील एक दृश्य कोणत्याही धर्माला संकटात टाकेल. सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या चित्रपटाला अशा धमक्या कोणीही देऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT