Pathaan Controversy: Vivek Agnihotri Gets Death Threats From Shah Rukh Khan Fans sakal
मनोरंजन

Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याची धमकी, शाहरुखच्या फॅन्सचा पराक्रम..

'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील भगव्या बिकिनीवरुन सुरू झालेला वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून पठाण यांच्या 'बेशरम रंग' या गाण्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावरून बराच वाद झाला होता. आता हा वाद चांगलाच टोकाला गेला आहे.

मध्य प्रदेशचे मंत्री नट्टोराम मिश्रा यांनी भगवी बिकिनी परिधान केल्याबद्दल अभिनेत्री आणि निर्मात्यांना लक्ष्य केले तेव्हा त्यानंतर ही सर्व सुरू झाले. आता या गाण्याला विवेक अग्निहोत्रीने विरोध केल्याबद्दल विवेक यांना धमक्या येत आहेत.

झालं असं की, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी 'पठाण'च्या 'बेशरम रंग' या गाण्याला विरोध केला होता. इतकेच नव्हेतर बेशरम रंग या गाण्याची इन्स्टाग्रामवर खिल्ली उडवताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, 'इन्स्टा रील बॉलीवूड गाण्यांमुळे बेकार होत चालले आहे.' त्याने या वादात उडी घेतल्यानंतर लगेचच लोकांनी विवेकला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी त्याची मुलगी मल्लिका अग्निहोत्रीचे भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले. त्याचबरोबर अनेक जण त्यांना धमक्याही देत ​​आहेत.

ट्विटरवर विवेक अग्निहोत्रीने शाहरुख खानच्या चाहत्यांकडून आलेल्या अनेक कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये शाहरुखचे चाहते त्याला शिवीगाळ करताना आणि जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहेत. त्यात लिहिले आहे की, 'मी तुला शोधत आहे... मी घरात येऊन तुला मारून टाकीन.'.. तर एकाने म्हंटले आहे, 'तुमचे जुने ट्विट हटवा.' हे स्क्रीनशॉट शेअर करताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, 'बादशाह बरोबर होता. नकारात्मकता सोशल मीडियावरच आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT