Pathaan Movie
Pathaan Movie Sakal
मनोरंजन

Pathaan Box Office: 1000 कोटींची कमाई करून रचला इतिहास, मात्र अजूनही शाहरुखचा 'पठाण' या 4 चित्रपटांच्या मागेच

सकाळ डिजिटल टीम

जे कोणी करू शकले नाही, ते बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने करून दाखवले. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने इतिहास रचला आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार केला.

रिलीजच्या पहिल्या टप्प्यात जगभरात 1000 कोटींची कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 516.92 कोटींवर गेले आहे. पठाणचा डंका देश-विदेशात वाजत आहे.

पठाण हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पठाणकडून त्याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. रिलीजच्या 27 व्या दिवशीही या चित्रपटाने दमदार कमाई सुरूच ठेवली आहे.

किंग खानच्या चित्रपटाने 1000 कोटींचा आकडा ओलांडला असेल, पण हा चित्रपट सर्वाधिक कलेक्शनच्या बाबतीत अजूनही काही टॉप चित्रपटांपेक्षा मागे आहे. आम्ही तुम्हला त्या 4 चित्रपटांबद्दल सांगतो ज्यांचा रेकॉर्ड शाहरुख खान अजूनही मोडू शकला नाही.

आरआरआर

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. राम चरण, ज्युनियर एनटीआर यांचा हा चित्रपट ऑस्करवर थैमान घालण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे जगभरात 1170 कोटींचे कलेक्शन आहे.

दंगल

शाहरुख खान बॉक्स ऑफिस किंग बनण्याआधी आमिर खानने हा टॅग गाठला आहे. त्याच्या दंगल या चित्रपटाने देश-विदेशात असे कलेक्शन केले आहे, ज्याचा विक्रम मोडणे फार कठीण होते. किंग खानने दंगलचे भारतीय कलेक्शन आधीच पार केले आहे. पण त्याच्या वर्ल्डवाइड कलेक्शनला स्पर्श करणे थोडे कठीण जाईल. दंगलने जगभरात 2070.3 कोटींची कमाई केली आहे.

बाहुबली 2

प्रभासच्या बाहुबली या चित्रपटाने अनेक विक्रम केले. त्याचे जगभरातील कलेक्शन 1788.06 कोटी आहे.

केजीएफ 2

यशच्या KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जगभरात 1208 कोटींची कमाई केली. या चित्रपटातून यश पॅन इंडिया स्टार बनला. लोक त्याच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

यापैकी कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट शाहरुख खानचा पठाण ब्रेक करू शकतो हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT