Pathaan King Khan Shah rukh Advance booking  esakal
मनोरंजन

Pathaan Ticket Sales Record : पठाणनं तोडलं 'बाहुबली 2' चं रेकॉर्ड! किंग खानचं वादळ घोंघावणार?

बॉलीवूडच्या किंग खानच्या ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या चार वर्षांपासून वाट पाहत होते तो अवघ्या दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Ticket Sales Record : बॉलीवूडच्या किंग खानच्या ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या चार वर्षांपासून वाट पाहत होते तो अवघ्या दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. शाहरुखनं या चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असून त्यानं प्रमोशनसाठी देखील मोठी रक्कम मोजली आहे. अशातच पठाणच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे.

खरं तर प्रदर्शनापूर्वीच बॉलीवूड, टॉलीवूडच्या चित्रपटांना मोठी अॅडव्हान्स बुकींग मिळणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र ते बुकींग कोटींच्या घरात असेल तर त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शाहरुखनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चाहत्यांच्या आनंदाच्या, उत्सुकतेच्या पोस्ट शेयर केल्या आहेत. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

शाहरुखनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांना धन्यवादही दिले आहेत. चाहत्यांनी एकाचवेळी शेकडो तिकिटं घेऊन शाहरुखला सुखद धक्का दिला आहे. अशातच बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या पठाणनं प्रदर्शनापूर्वीच एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं राजामौलींच्या बाहुबलीचा रेकॉर्ड ब्रेक केलं आहे.

पठाणनं बाहुबली २ चे रेकॉर्ड मोडले असून आता तो प्रदर्शनापूर्वीच सर्वाधिक अॅडव्हान्स बुकींग होणारा चित्रपट ठरला आहे. या यादीमध्ये ऋतिकच्या वॉर या चित्रपटाचा समावेश होता. पठाण हा तेलुगू आणि तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. पठाणला अॅडव्हान्स बुकींगसाठी मिळालेला हा प्रतिसाद समाधानकारक बाब मानली जात आहे.

अॅडव्हान्स बुकींगमध्ये पठाणची आतापर्यत ६ लाख ६३ हजारांची तिकिटं विकली गेली आहेत. हिंदी चित्रपटामध्ये एक वेगळा विक्रम पठाणनं आपल्या नावावर केला आहे. त्यानं बाहुबली २ चे रेकॉर्ड केले आहे. त्या तिकिटांची रक्कम पाहिल्यास तो आकडा वीस कोटींच्या पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT