Pathaan King Khan Shah Rukh Movie fans bundle of notes  esakal
मनोरंजन

Pathaan Crazy Fan : पठाण सुरु असताना चाहत्यानं उधळल्या नोटा! किंग खानसाठी कायपण...

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या टॉपला आहे. त्याचे कारण त्याचा पठाण हा चित्रपट अपेक्षापेक्षाही जास्त हिट झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Movie News : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या टॉपला आहे. त्याचे कारण त्याचा पठाण हा चित्रपट अपेक्षापेक्षाही जास्त हिट झाला आहे. केवळ हिटच नाहीतर त्यानं पाचशे कोटींची कमाईही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाण हा वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आला होता. आता त्यावर चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव केला आहे.

पठाणचा फिव्हर दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. किंग खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या कलाकारासाठी ते काहीही करायला तयार होत आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं तर कित्येकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये त्या चाहत्यानं पठाण चित्रपट सुरु असताना जे काही केले त्याची सगळीकडे चर्चा आहे.

Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये पठाणनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. प्रदर्शनापूर्वीच कमालीच्या वादात सापडलेल्या पठाणला मात्र चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं आहे. तर काहींनी एकाचवेळी शंभर दोनशे तिकिटं काढून किंग खानबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. अशाच एका किंग खानच्या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेत आहे.

त्या चाहत्यानं पठाण चित्रपट सुरु असताना चक्क नोटा उधळल्याचे दिसून आले आहे. पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण हे गाणं सुरु झाले आणि प्रेक्षकांना उत्साहाचे भरते आले. यामध्ये एकानं तर नोटा उधळून थिएटरमधील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ नेटकऱ्यांकडून वाहवा मिळवताना दिसतो आहे.

बॉलीवूडच्या किंग खानच्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलीवूडमध्ये पठाणनं कमाईचे वेगवेगळे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. प्रदर्शनापूर्वीच मोठ्या वादात सापडलेल्या पठाणकडून एवढ्या मोठ्या कमाईची अपेक्षा कुणीही केली नव्हती. मात्र किंग खाननं आपल्या चित्रपटातून ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Controversy : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, राजू शेट्टींनी मांडल गणित; '१७ किमीचा डोंगराएवढा भराव'

मराठमोळ्या अभिनेत्याने घेतलं तिसरं घर, गणेशपूजाही केली, चिमुकल्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला व्हिडिओ

IPL 2026 : विराट कोहलीचा 'पार्टनर' परतणार, RCB प्ले ऑफमध्ये राडा घालणार… गतविजेत्यांना मिळालं बळ

Video : अखेर सरकार खऱ्या रूपात सखीसमोर येणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकही हैराण; "तेजस्विनीला परत आणा"

Latest Marathi News Live Update : ठाण्यात सर्व औषध दुकान दारांचा बंदला पाठिंबा

SCROLL FOR NEXT