Pathaan Shah Rukh Khan Reaction esakal
मनोरंजन

Pathaan Shah Rukh Khan Reaction: हजारो चाहत्यांसमोर गरजला 'पठाण'! म्हणाला, आता आपण...

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा पठाण नावाचा चित्रपट येत्या वर्षात येतो आहे त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला आहे.

युगंधर ताजणे

Pathaan Shah Rukh Khan bollywood King Khan Reaction : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा पठाण नावाचा चित्रपट येत्या वर्षात येतो आहे त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला आहे. त्यावर शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे.

हजारो चाहत्यांसमोर शाहरुखनं त्याच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. आजकाल आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. आपण भलतेच सकुंचित झालो आहोत. शाहरुखचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दीपिकानं शाहरुखच्या पठाण चित्रपटामध्ये बिकिनी परिधान करुन जो डान्स केला आहे त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दीपिकानं भगव्याच रंगाची बिकीनी का घातली, त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते आहे.

दीपिका आणि शाहरुखच्या त्या बोल्ड व्हिडिओनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला अनेकांनी राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील व्यक्तींनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार अशी भीती निर्माते आणि दिग्दर्शक यांना होती. अखेर त्यावर शाहरुखनं प्रतिक्रिया देऊन चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. शाहरुखनं हजारो चाहत्यांसमोर जे काही चालले आहे त्याविषयी खंत व्यक्त केली आहे.

शाहरुख आपल्या त्या भाषणामध्ये म्हणाला की, जे काही होतं आहे त्यामध्ये सोशल मीडियाची भूमिका आपण समजावून घ्यायला हवी. गेल्या काही दिवसांपासून आपण फारच सकुंचित होत चाललो आहोत. त्याचे कारण हा सोशल मीडिया आहे. त्यावर आपण ज्या प्रकारे व्यक्त होतो आहोत त्याचा परिणाम खूपच वेगवेगळ्या रीतीनं होतो आहे. नकारात्मकता सोशल मीडियावर जास्त प्रभाव निर्माण करते. हे विसरुन चालणार नाही.

आपल्याला एक ठाम भूमिका घ्यावी लागते. आपण करत असलेल्या त्या कामाची लोक कशाप्रकारे समीक्षा करतात यावर आपले नियंत्रण नसते. मात्र त्यावरुन जाणीवपूर्वक गोष्टी ठरवल्या जातात की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याची भीती शाहरुखनं यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT