Pathaan Movie Sakal
मनोरंजन

Pathaan Movie: बापरे! पहिल्याच दिवशी शाहरुखचा 'पठाण' कमावणार 35 कोटी...

जसजशी चित्रपटाची रिलीज डेट समोर येत आहे, तसतशी 'पठाण'च्या ओपनिंग डेच्या कमाईच्या बातम्याही समोर येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील पठाण हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाशी संबंधित दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. जसजशी चित्रपटाची रिलीज डेट समोर येत आहे, तसतशी 'पठाण'च्या ओपनिंग डेच्या कमाईच्या बातम्याही समोर येत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्स याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत.

दरम्यान, पठाण चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबाबतच्या बातम्या समोर आल्या आहेत, जे पाहिल्यानंतर निर्माते आणि शाहरुख खानचे चाहते खूप खूश होतील. या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता पठाण चित्रपटाच्या कमाईबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ओपनिंग डे कमाई करणार आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 35-45 कोटींची कमाई करू शकतो. हा अहवाल खरा ठरला तर शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर येताच धूम ठोकेल.

शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडिया यांचा 'पठान' हा चित्रपट 25 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडिया यांच्याशिवाय दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात कॅमिओ करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT