Shah Rukh Khan Sakal
मनोरंजन

Pathaan: 'पठाण'मधून डिलिट करण्यात आलेला सीन व्हायरल... शाहरुखनं केलं

'पठाण' चित्रपटातून शाहरुख खानचा एक महत्त्वाचा सीन काढून टाकण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत कोणाचा जलवा असेल तर ते म्हणजे सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण'चा आहे. सध्या ‘पठाण’ चित्रपट यशाचा अनोखा विक्रम करत पुढे जात आहे. रिलीजच्या 11 दिवसांनंतरही हा चित्रपट दुहेरी अंकात कमाई करत आहे.

दरम्यान, आता 'पठाण' चित्रपटातून शाहरुख खानचा एक महत्त्वाचा सीन काढून टाकण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. त्याचबरोबर शाहरुखने 'पठाण'च्या स्क्रिप्टवर कसे काम केले आहे.

'पठाण'चे लेखक श्रीधर राघवन यांनी दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले आहेत. श्रीधर राघवन यांनी सांगितले आहे की- "पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खानचा एक टॉर्चर सीन दाखवण्यात आल्याचे तुम्ही सर्वांनी पाहिले असेल, ज्याची खूप चर्चा झाली होती. पण जर तुम्ही चित्रपट नीट बघितला असेल तर तुम्हाला 'पठाण'मध्ये हा सीन नसेल दिसला".

"ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा सीन चित्रपटाच्या सुरुवातीला शाहरुखच्या एंट्रीपूर्वी सेट करण्यात आला होता. मात्र निर्मात्यांच्या सल्लामसलतीनंतर चित्रपटातून हे टॉर्चरचे सीन हटवण्यात आले.असे अनेक सीन लिहिण्यात आले पण ते फायनल झाले नाहीत".

श्रीधर राघवनने पुढे सांगितले की- 'शाहरुख खानने एक अभिनेता आणि लेखक म्हणून पठाणसाठी आपले 100 टक्के दिले. जेव्हा मी या चित्रपटाची कथा लिहिली तेव्हा मला हे जाणून आश्चर्य वाटले की शाहरुखनेही पठाणसाठी 70-100 पाने लिहिली आहेत.

त्याच वेळी, पठाण या चित्रपटात हॉस्पिटलमध्ये नॉन-सर्व्हिस आर्मी ऑफिसर्सची टीम तयार करण्याची कल्पना देखील शाहरुख खानची होती, जी तुम्ही चित्रपटादरम्यान पाहिली असेल. अशाप्रकारे किंग खानने पठाण चित्रपटासाठी खूप कष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT