Singer Paula Abdul: Esakal
मनोरंजन

Singer Paula Abdul: प्रसिद्ध गायिकेनं अमेरिकेतील प्रसिद्ध सेलिब्रिटीवर लावला 'लैंगिक छळाचा' आरोप!

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका पाउला अब्दुल ही अचानक चर्चेत आली आहे.

Vaishali Patil

Singer Paula Abdul: अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका पाउला अब्दुल ही अचानक चर्चेत आली आहे. पाउला अब्दुलनं अमेरिकन आयडॉलचा कार्यकारी निर्माता आणि 'सो यू थिंक यू कॅन डान्स'चा जज निगेल लिथगो यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

निगेल लिथगोने तिचा 'लैंगिक छळ' केल्याचा आरोप करत पाउला अब्दुलनं खटला दाखल केला आहे. पाउलाने कॅलिफोर्नियाच्या लैंगिक शोषण आणि उत्तरदायित्व कायद्याची मुदत संपण्याच्या 72 तासांपूर्वीच हा खटला दाखल केला.

मिडिया रिपोर्टनुसार, पाउलाने आरोप केला आहे की अमेरिकन आयडॉलच्या सुरुवातीच्या सीझनमध्ये निगेलने लिफ्टमध्ये तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्यावेळी तिने तिथून पळ काढला.

निगेल हा टेलिव्हिजन शोचा प्रसिद्ध निर्माता आहे. त्याच्याबद्दल काही बोलले तर तिचे करिअर संपेल अशी तिला भीती होती. त्यामुळे इच्छा असूनही ती निगेलविरुद्ध काही बोलू शकली नाही.

आता पाउलाने खटला दाखल केल्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जात आहे. निगेल लिथगोविरोधात तक्रार केली असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, यावर निगेलने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही

पाउला ही एक अमेरिकन गायक, डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेत्री आणि टिव्ही पर्सन आहे. तिने वयाच्या 18 व्या वर्षी लॉस एंजेलिस लेकर्ससाठी चीअरलीडर म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती लेकर्स गर्ल्सची मुख्य नृत्यदिग्दर्शक बनली, जिथे तिला जॅक्सनने शोधले आणि त्यानंतर तिच्या करियरला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT