Pawan Kalyan Arrest Chandrababu Naidu Case Controversy  esakal
मनोरंजन

Pawan Kalyan : चंद्राबाबूंनंतर आता साऊथच्या एका बड्या अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, काय आहे कारण?

आता साऊथच्या एका अभिनेत्याला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Pawan Kalyan Arrest Chandrababu Naidu Case Controversy : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना काल भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता साऊथच्या एका अभिनेत्याला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण हा आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याला काही करुन चंद्राबाबूला भेटायला आंध्रमध्ये जायचे होते. मात्र पोलिसांनी मज्जाव केल्यानं त्यानं रस्त्यावर उतरुन त्या घटनेचा निषेध नोंदवला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचे सांगितले जात आहे. पवन कल्याण हा साऊथचा प्रचंड लोकप्रिय असणारा अभिनेता असून त्याच्या अटकेनं चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू यांना भेटण्यासाठी विजय हा विजयवाड्याच्या दिशेनं निघाला होता. तो त्यांच्या समर्थनासाठी जात असल्याची चर्चा आहे. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला विजयवाडामध्ये जाण्याची परवानगी नाकारली होती. त्या घटनेचे सोशल मीडियावर देखील जोरदार प्रतिसाद उमटल्याचे दिसून आले आहे.

चंद्राबाबू यांना अटक झाल्याच्या निषेधार्ध पवन कल्याणनं रस्त्यावर झोपून त्या गोष्टीचा निषेध केला आहे. तो व्हिडिओ आता तुफान लोकप्रिय झाला आहे. त्यावरुन पवनला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कल्याणला आंध्रप्रदेशमध्ये जायचे होते. आणि त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. तेव्हा त्यानं पोलिसांच्या आठमुठेपणाला विरोध म्हणून चक्क रस्त्यावर झोपून आपला राग व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar Building Collapse: विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; ३२ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच

Rain Update: 'सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचे दिवस वाढणार'; शनिवारपासून पूर्वा नक्षत्र, गणरायाचे पावसात स्वागत

Ganesh festival २०२५: 'गणरायांच्‍या आगमनाने आनंदवर्षा'; सातारा जिल्ह्यात वरुणराजाच्‍या विश्रांतीने उत्‍साहाला उधाण

Karad Accident: 'राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार'; भीषण धडकेने हेल्मेट तुटलं अन्..

No Bread Sandwich: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा पौष्टिक पनीर सँडविच, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT