Pawan Kalyan falls from his car after a fan tries to hug him. Google
मनोरंजन

Video:'या' दाक्षिणात्य सुपरस्टारच्या अंगावर चाहत्यानं चक्क मारली उडी

निवडणूक प्रचारा दरम्यान अभिनेता पवन कल्याणच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओची भलतीच चर्चा

प्रणाली मोरे

दक्षिणेकडचा सुपरस्टार(Tollywood) म्हणून पवन कल्याणची (Pawan Kalyan) भलतीच क्रेझ चाहत्यांमध्ये आहे याचा एक दाखलाच मिळाला आहे. सध्या पवन कल्याणच्या या व्हिडाओची जोरदार चर्चा होत आहे. सिनेमात काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावलंय. मराठी,हिंदी,दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अशा अनेक कलाकारांच्या नावाची भलीमोठी लिस्ट तयार होईल. तर पवन कल्याणही त्या लिस्टमधलं एक नाव. पवन कल्याणही राजकारणात आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करीत आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी हा दाक्षिणात्य अभिनेता जय्यत तयारी करीत आहे. खरंतर जनसेवा पार्टीचा तो सर्वेसर्वा आहे. आणि त्याच्या पार्टीनं लोकसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत मैत्रीचा हातही धरला आहे. म्हणजे भाजपाचा तो मित्रपक्ष बनला आहे. तर त्याचं झालं असं की ,सध्या पवन कल्याणचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की तो कारच्या वरती चढून निवडणुकांसाठी प्रचार करीत आहे. तो हात हवेत हात हलवून लोकांना अभिवादनही करताना मध्ये-मध्ये दिसत आहे. तितक्यात एक माणूस मागून येतो आणि थेट त्याच्या खांद्यावरच उडी मारतो. आणि पुढे काय होतं ते सारे 'आ' वासून बघत राहिले असतील. तर त्या माणसाचा धक्का लागल्यामुळे पवन कल्याण अधांतरी उभा असल्यानं अचानक कारच्या छतावर कोसळताना दिसतोय. नंतर त्यानं स्वतःला कसंबसं सावरलंय खरं. पण त्याला दणका बसला असणार हे नक्की.

या गोष्टीचा खुलासा अद्याप झाला नाही की पवन कल्याणवर मागून उडी घेणारा तो माणूस नेमका होता कोण? पवन कल्याणवर उडी मारल्यानंतर तो माणूसही खाली गर्दीत पडला आणि त्याला खालच्या गर्दीतील लोकांनी बाजूला केलं. इतक्या जोरात त्या माणसानं पवन कल्याणवर उडी मारली होती, पण नशीब बलवत्तर म्हणून अभिनेत्याला फार दुखापत झाली नाही. अन्यथा निवडणुकी आधीचा हा प्रचार भलताच महाग ठरला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT