Pawan Singh Jyoti Singh Actress divorce news  esakal
मनोरंजन

Pawan Singh Wife Jyoti : 'घटस्फोट घेईल पण मला....'! पत्नीच्या अटी अन् मागण्या ऐकून पवनला बसला धक्का

मनोरंजन विश्वामध्ये पवन सिंग आणि त्याची पत्नी ज्योति सिंग यांची गोष्टच वेगळी आहे.

युगंधर ताजणे

Pawan Singh Jyoti Singh Actress divorce news : मनोरंजन विश्वामध्ये पवन सिंग आणि त्याची पत्नी ज्योति सिंग यांची गोष्टच वेगळी आहे. ते कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील हे काही सांगता येत नाही.अशावेळी आता तर त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनं मोठा गदारोळ केल्याचे दिसून आले आहे.

भोजपूरी चित्रपट विश्वामध्ये पवन सिंगची लोकप्रियता मोठी आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. अशातच या लोकप्रिय सेलिब्रेटीच्या बाबत धक्कादायक बातमी समोर आल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्याबाबत असे काही होऊ शकते यावर चाहत्यांना विश्वास ठेवणे कठीण होऊन बसले आहे. पवन सिंहची पत्नी ज्योति सिंग यांच्यात घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

Also Read - AADHAR : 'आधार' क्रमांक जोडलेले तुमचे बँक खाते सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित आहे का?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योति काही घटस्फोटाच्या बातमीसाठी तयार नाही. ज्योतिनं घटस्फोटाच्या बदल्यात मोठ्या रकमेची मागणी केली आहे. त्यामुळे ती केस सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्योति सिंग आणि पवन सिंग यांच्या घटस्फोटावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली होती. त्यांच्या घटस्फोटाविषयी कौटूंबिक न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन टाईम सेटलमेंटनुसाक दावा सोडविण्यावर भर दिला जात आहे. पवनकडून तर ज्योति सिंगला एक कोटी रुपये आणि नोएडामध्ये घर देण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला आहे. यात अजून दोन्ही सेलिब्रेटींकडून कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. ज्योतिकडून जास्त पैशांची मागणी केली जात आहे. ज्योतीनं तीन कोटींची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.

तीन कोटी रुपये आणि घर देण्यासाठी पवन तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योति सिंगच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीला घटस्फोट घ्यायचा नाही. ती पवन सिंग सोबत राहायला तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

Gold Rate Today: महिन्याभरात सोनं तब्बल 14 हजारांनी स्वस्त! चांदीतही मोठी घसरण; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे ताजे भाव

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

IAS Transfer Maharashtra : राज्यातील पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आठवड्यात दुसऱ्यांदा बदली, अन्न नागरी पुरवठा, महावितरणमध्ये मोठा बदल

SCROLL FOR NEXT