pawankhind fame actor Harish Dudhade married to samruddhi nikam wedding  sakal
मनोरंजन

Harish Dudhade: 'पावनखिंड'फेम हरिष दुधाडे विवाह बंधनात.. बायको आहे..

अनेक मालिका, चित्रपटात दमदार अभिनय करणारा हरिष अडकला लग्नाच्या बेडीत..

नीलेश अडसूळ

सध्या 'तुमची मुलगी काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेला' 'इन्स्पेक्टर विजय भोसले' म्हणजे अभिनेता हरिष दुधाडे. त्यांची ‘पावनखिंड’ या चित्रपटातील ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका विशेष गाजली. सध्या तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रॉजेक्ट बाबत प्रेक्षकांना उत्सुकता असतानाच त्याने एक आनंदाची बातमी दिली आहे. हरीश दुधाडे याने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली असून तो लग्नबंधनात अडकला आहे.

(pawankhind fame actor Harish Dudhade wedding )

या लग्नाबाबत त्याने कुणालाच कल्पना दिली नव्हती. पण अभिनेता अंकित मोहन याने हरिषच्या लग्नाचे फोटो शेयर केले आणि ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचली. आता हरिषने स्वतः त्याच्या पत्नीसोबत फोटो शेयर करत लग्नाची गोड बातमी दिली आहे.

हरीश दुधाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आज त्याने आपल्या बायकोसोबत फोटो शेयर केला आहे. समृद्धी निकम असे त्याच्या बायकोचे नाव आहे. यावेळी हरीश आणि त्याची बायको अत्यंत पारंपरिक पोषाखात दिसत आहेत. या फोटोला त्याने “आणि नवीन प्रवासाला सुरुवात…” असे कॅप्शन दिले आहे.

‘माझे मन तुझे झाले’ मालिकेतून हरिषने मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्यानंतर 'नकळत सारे घडले', 'सरस्वती', 'तू सौभाग्यवती हो..', ' तुमची मुलगी काय करते' या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. फक्त मालिकाच नव्हे तर अनेक मराठी चित्रपटातही तो झळकला आहए. पावनखिंड’, ‘शिवप्रताप गरुडडझेप’, ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’ अशा ऐतिहासिक सिनेमांत त्याने काम केलं आहे. हरिषच्या लग्नाच्या फोटोवर मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

SCROLL FOR NEXT