पावनखिंड Instagram
मनोरंजन

पावनखिंडचा थरार! ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

सकाळ डिजिटल टीम

आंतराष्ट्रीय पातळीवर युद्धनीतीचे आदर्श मानले जाणारे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लेखक-अभिनेता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील 'पावनखिंड' (Pawankhind) या तिसऱ्या चित्रपटात शिवरायांच्या रूपात रसिकांचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) झळकणार आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर 'पावनखिंड'साठी चिन्मयनं पुन्हा एकदा आपल्या मस्तकी शिवरायांचा जिरेटोप चढवला आहे.

चित्रपटात मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) , अंकित मोहन (Ankit Mohan), क्षिती जोग (kshitee jog), अजय पूरकर (Ajay Purkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि शिवराज वायचळ (Shivraj Waichal) या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दिग्पाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यांनी पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ''उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे 'पावनखिंड' चे ट्रेलर! हर हर महादेव.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT