payal ghosh anurag 
मनोरंजन

पायल घोष म्हणाली, पोलिसांकडे खोटं बोलला अनुराग, लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट केली जावी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावत मुंबईपोलिसांकडे एफआयआर दाखल केली होती. पायलच्या तक्रारीवरुन १ ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशीसाठी अनुरागला बोलवलं होतं. ८ तास चाललेल्या या चौकशीत अनुरागने पायलचे सगळे आरोप फेटाळून लावले. अनुरागची वकिल प्रियांका खिमानीने या संदर्भात एक स्टेटमेंट देखील सादर केलं आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देत पायल घोषने म्हटलंय की अनुराग कश्यप पोलिसांकडे खोटं बोलला आहे. 

पायलने ट्विटरवर लिहिलंय, 'मिस्टर कश्यप पोलिसांना दिलेल्या जबाबात खोटं बोलला आहे. सत्य जाणुन घेण्यासाठी माझे वकिल अनुराग कश्यपची नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्यासाठी ऍप्लिकेशन देतील . न्याय मिळण्यासाठी आज पोलिस स्टेशनमध्ये ऍप्लिकेशन दिलं जाईल.' पायलने तिच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केलं आहे. 

अनुराग कश्यपची वकिल प्रियांकाने सादर केलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की 'अनुराग कश्यपने पोलिसांना सांगितलं की ज्या वेळी ऑगस्ट २०१३ मध्ये कथित लैंगिक शोषणाचा आरोप पायल घोषने केला आहे त्यावेळी तो श्रीलंकामध्ये त्याच्या एका सिनेमाच्या शूटींगसाठी गेला होता. त्याने हे देखील सांगितलं की यासंदर्भातील पुरावे आणि कागदपत्र पोलिसांना दाखवली गेली आहेत.'

payal ghosh demands narco analysis and lie detector test of anurag kashyap  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT