Pearl V Puri  
मनोरंजन

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पर्लला न्यायालयीन कोठडी

पर्लला जामिन मिळाल्याची चर्चा खोटी

स्वाती वेमूल

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता पर्ल व्ही. पुरीला Pearl V Puri १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पर्लसह इतर पाच जणांना वसईतून मुंबई पोलिसांनी अटक केली होती. 'नागिन' Naagin या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्लला जामिन मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र कोर्टासमोर हजर राहिले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती समोर येत आहे. पर्लविरोधात पोक्सोअंतर्गत (POCSO) बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pearl V Puri not granted bail in alleged rape case sent to 14 days judicial custody)

"ही घटना जुनी आहे पण १७ वर्षीय मुलीने तिच्या आईसह पोलीस स्थानकांत येऊन तक्रार नोंदवली असून याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे", अशी माहिती मिरा भाईंदर वसई विरार झोन २चे उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. पर्लच्या अटकेनंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी त्याची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. 'नागिन' मालिकेची निर्माती एकता कपूरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित पर्लवरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाली एकता कपूर?

'पीडित मुलीच्या आईसोबत माझं बोलणं झालं. पर्लचं नाव विनाकारण या प्रकरणात घेतलं जात आहे. पर्लचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण मुलीचे वडील या प्रकरणात पर्लचं नाव घेत आहेत. मालिकेच्या सेटवर काम करणारी महिला आपल्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही, हे त्यांना सिद्ध करायचं आहे. ही गोष्टी अत्यंत चुकीची आहे. मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कोण बरोबर, कोण चूक हे न्यायालय ठरवेल. मात्र पीडीत मुलीच्या आईने जे मला काल रात्री सांगितलं, त्यावरुन मी माझं मत मांडत आहे', असं एकताने लिहिलं. निया शर्मा, क्रिस्टल डिसूझा, अनिता हसनंदानी यांसारख्या सेलिब्रिटींनीही पर्लची बाजू घेतली.

पर्लने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'नागिन ३', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' या मालिकांमध्ये त्याने काम केलंय. 'ब्रह्मराक्षस २' या मालिकेतही तो झळकला होता. २०१३ मध्ये त्याने 'दिल की नजर से खुबसूरत' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT