People crowd to see Pankaj Tripathi performing the Shraddha of his father  SAKAL
मनोरंजन

Pankaj Tripathi: 'वडिलांचे श्राद्ध सुरु आहे अन् तुम्ही....' पंकज त्रिपाठी चाहत्यांवर रागावला!

पंकज त्रिपाठींना वडीलांचा श्राद्धविधी करायला जेव्हा गावी गेले होते तेव्हा फॅन्सची खुप गर्दी बघायला मिळाली

Devendra Jadhav

Pankaj Tripathi News: पंकज त्रिपाठींच्या वडीलांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. पंकज त्रिपाठींवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठींना साहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांना वडीलांची खुप आठवण आली.

वडीलांचे अंत्यसंस्कार झाल्यावर पुढचे विधी करायला गावी गेले होते. तेव्हा पंकज त्रिपाठींना पाहायला इतकी गर्दी लोटली की बाऊन्सरला बोलवावं लागलं

श्राद्धविधीच्या वेळी लोकांची उडाली झुंबड

अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडीलांचा श्राद्ध सोहळा 1 सप्टेंबर रोजी पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मंत्री पंकजच्या वडीलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बिहारमधील बरौली येथील बेलसंद गावात पोहोचले.

पंकज त्रिपाठी सकाळपासून वडिलांच्या श्राद्धविधीसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, लोकांच्या भेटीगाठी करत होते. यावेळी सेल्फी काढणाऱ्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे पंकज त्रिपाठींना गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बाऊन्सरला पाचारण करावं लागलं.

वडिलांना पंकज त्रिपाठीच्या कामाची माहिती नव्हती

पंकज त्रिपाठी हे बिहारमधील गोपालगंज भागातील रहिवासी आहे. अभिनेता करिअरच्या निमित्ताने मुंबईत राहत असताना वडील आणि आई गावात राहत होते. 'मॅशेबल'शी संवाद साधताना पंकज त्रिपाठीने एकदा सांगितले की, "मुलगा काय करतो, कुठे काम करतो अशा गोष्टींमध्ये पंकजच्या वडिलांना अजिबात रस नव्हता. याशिवाय मुलगा पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नव्हते."

पंकज त्रिपाठीचे वडील एकदाच मुंबईत आले, कधीच थिएटरला गेले नाहीत

पंकज त्रिपाठी यांनी मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. इथली मोठमोठी घरं आणि इमारती त्यांनाआवडत नव्हत्या. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की त्यांचे वडील कधीही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले नाहीत. घरातही ते आपल्या मुलाचे सिनेमे टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर कुणी दाखवले तरच बघायचे. काही वर्षांपुर्वीच पंकज त्रिपाठीने आई आणि वडिलांसाठी टीव्ही सेट लावला होता. एकुणच एकीकडे OMG 2 चं यश साजरं करत असतानाच पंकज त्रिपाठींना व्ययक्तिक आयुष्यातील या दुःखद गोष्टींना सामोरं जावं लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT