‘People don’t respect you because you’re an elder’: Urfi Javed criticises Jaya Bachchan for telling a photographer ‘hope you fall’  sakal
मनोरंजन

Urfi Javed: असशील मोठी! जया बच्चन यांच्या त्या कृत्यावर भडकली उर्फी, म्हणाली..

जय बच्चन यांनी त्यांचे फोटो काढणाऱ्या पापाराजीना चुकीची वागणूक दिल्याने उर्फीने चांगलाच समाचार घेतला आहे.

नीलेश अडसूळ

urfi javed: बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदा एअरपोर्टवर जाताना दिसत होत्या. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी एका फोटोग्राफरला ठेच लागून पडता पडता वाचला. यावर जया बच्चन यांनी त्याला 'तो ठीक आहे की नाही' हे विचारण्याऐवजी 'जे झालं ते बरं झालं' असं त्या म्हणाल्या. 'तो पुन्हा पडायला हवा..' असंही त्या म्हणाल्या. जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता उर्फी जावेदनंही या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.

(‘People don’t respect you because you’re an elder’: Urfi Javed criticises Jaya Bachchan for telling a photographer ‘hope you fall')

उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन (jaya bachchan) यांचा व्हिडीओ शेअर करत चांगलीच कानउघाडणी केली आहे. उर्फी म्हणाली, 'त्यांनी खरंच म्हटलं का की तू पुन्हा पडायला हवा. मग कृपया तुम्ही कोणीच त्यांच्यासारखे होऊ नका. मी आशा करते की आपण सर्वजण नेहमीच भक्कमपणे उभे राहू. मग ते कॅमेराच्या समोर असो किंवा कॅमेराच्या मागे. तुम्ही मोठ्या आहात म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत किंवा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तीशाली आहात म्हणून लोक तुम्हाला मान देत नाहीत. तर तुम्ही त्यांच्याशी कसे वागता किंवा किती चांगले वागता यावरून लोक तुमचा आदर करतात.'

याशिवाय उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे की, 'मला माझे विचार मांडायला आवडत नाही. पण कधीकधी मी स्वतःवर संयम ठेवू शकत नाही. अर्थात मला माहीत आहे की मी जे करतेय त्याने मला कामाच्या संधीही गमवाव्या लागतील. पण गप्प राहणं आता शक्य नाही. मला वाटतं जे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे नसतात त्यावर बोलणं आपण टाळतो. यावरून तुम्ही कसे आहात हे समजतं.' या स्टोरी मधून उर्फीने जया बच्चन यांच्या वर्तनावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT