Phakaat marathi movie poster cast release date hemant dhome rasika sunil avinash narkar sakal
मनोरंजन

Phakaat movie: हेमंत ढोमे सह असणार 'हे' इरसाल नमुने घेऊन येतायत 'फकाट'.. या दिवशी होणार रिलीज..

'फकाट' मध्ये दिसणार दमदार कलाकारांची फौज..

नीलेश अडसूळ

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट असतेच, हीच गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही.

याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फकाट' असे हटके नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून येत्या १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Phakaat marathi movie poster cast release date hemant dhome rasika sunil avinash narkar)

या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.

पोस्टरमध्ये चित्रपटातील सगळे कलाकार दिसत असून एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे आणि आजूबाजूला पैसेही दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय प्रकार आहे? काय रहस्य आहे, याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.

दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, "प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. यात कॉमेडी आहे, अ‍ॅक्शन आहे. यात हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा आहे. चित्रपटातील सगळेच कलाकार भन्नाट आहेत. प्रत्येकाने आपल्याला व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय दिला आहे.''

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक विधान...मतदार यादीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय म्हणाले?

'ते माझ्या मागे होते, मी जोरात पळत सुटलो आणि...' दिलीप प्रभावळकरांना स्वत:च वाटलं कौतूक, म्हणाले...'वयाच्या 80 व्या वर्षी...'

Video : मुंबई लोकलमध्ये चाकरमान्यांनी दादागिरी; 'दोन्ही सीट आमच्या' म्हणत प्रवाशांसोबत केलं धक्कादायक कृत्य, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Rahul Gandhi : चीनने जमीन हडपली कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर हे बोलला नसतात, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Ind vs england 5th Test : ''आजच्या काळात अशा चुका परवडणाऱ्या नाहीत''; आर. अश्विनने गिलच्या चुकांवर ठेवलं बोट,संघाच्या रणनीतीवर व्यक्त केली तीव्र नाराजी...

SCROLL FOR NEXT