Phakaat Movie release on 2nd june cast rasika sunil suyog gorhe love friendship sakal
मनोरंजन

Phakaat Movie: सुयोग-रसिकानं सांगितलं त्यांच्या नात्यातलं खास गुपित.. घर शेयर करण्यापासून ते..

'फकाट'च्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे -रसिका सुनील एकत्र करणार धमाल..

नीलेश अडसूळ

Phakaat Movie सध्या 'फकाट' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीही सुयोग आणि रसिकाने चित्रपटात आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे.

त्यामुळे आता 'फकाट'च्या निमित्ताने त्यांची हॅट्रिक होणार आहे. मुळात रसिका आणि सुयोगची पडद्यामागेही घनिष्ट मैत्री असल्याने पडद्यावरही त्यांची केमिस्ट्री तितकीच अफलातून वाटते.

त्यांची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना येत्या २ जून रोजी पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या मैत्रीतील अनेक गुपितं उलगडली आहेत.

(Phakaat Movie release on 2nd june cast rasika sunil suyog gorhe love friendship)

त्यांच्या मैत्रीबद्दल सुयोग गोऱ्हेने सांगितले की, ''आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांसोबत यापूर्वीही काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन निर्माण झाला आहे. आम्ही खूप धमाल करतो. कधी एकमेकांना कामाबद्दल सल्लेही देतो.''

''मुळात इतक्या वर्षांची मैत्री असल्याने आता आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत एकमेकांची रिऍक्शन कशी असेल, याचीही आम्हाला आता कल्पना असते. आम्ही भांडणेही तितकीच करतो.''

तर रसिका या मैत्रीबद्दल म्हणते, ''आमच्या सुरुवातीच्या काळात आम्ही घरही शेअर केले असल्याने एकमेकांची मेहनत, संघर्ष पाहिला आहे. सुयोगला जर एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्याचा आनंद सुयोगपेक्षाही मला जास्त होतो.''

''कधी कधी आम्ही वायफळ गप्पा मारत असलो तरी कामाबद्दलची आमची तितकीच चर्चा होते. सुयोग मित्र म्हणून तर बेस्ट आहेच शिवाय एक अभिनेता म्हणूनही तो तितकाच प्रतिभाशाली आहे. सेटवर तो त्याच्या व्यक्तीरेखेचा गांभीर्याने अभ्यास करतो.''

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित, श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: वय ९८... हाती काटा-चमचा, पुण्याच्या इंदू आज्जींचा शिष्टाचार तरुणांना लाजवणारा! हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

मैत्रीचा ‘जब्राट’ अनुभव लवकरच रुपेरी पडद्यावर; चित्रपटाचं दमदार पोस्टर प्रदर्शित

Leopard Attacks : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर बिबट्याने थेट झेप घेतली अन्..., पुढं घडलं भयानक

Crime News : पुरावा नसतानाही दहा वर्षांपूर्वीचा खून उघडकीस; नंदुरबार पोलिसांची कामगिरी

बाहुबलीतल्या शिवगामीला मराठी अभिनेत्रीने दिलाय आवाज; "तिचे दोन्ही काळ.."

SCROLL FOR NEXT