Phir Aayi Haseen Dilruba Teaser  esakal
मनोरंजन

Phir Aayi Haseen Dilruba Teaser: राणी पुन्हा येणार, प्रेमात वेडं करणार...'फिर आयी हसीन दिलरुबा' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

तापसीच्या नव्या चित्रपटाच्या पोस्टरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Phir Aayi Haseen Dilruba Teaser viral : वेडेपणालाही एक मर्यादा असते मात्र प्रेमातील वेडेपणा ही वेगळीच गोष्ट आहे. ज्यांनी तापसी अन् विक्रांत मेस्सीची हसीन दिलरुबा नावाची मालिका पाहिली असेल त्यांना वेगळं काही सांगण्याची गरज नाही. सध्या या चित्रपटाचा सिक्वेल हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

विक्रांत मेस्सी, तापसी पन्नु आणि सनी कौशल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या फिर आई हसीन दिलरुबाचा तो ट्रेलर आता चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सनं इंस्टावरुन तो व्हायरल केला असून त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, राणीच्या प्रेमातील वेडेपणा आणि त्यात आकंठ बुडालेले ते दोघेजण...फिर आई हसीन दिलरुबा पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर...

मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे ही फिल्म...

व्हायरल झालेल्या त्या टीझरमध्ये कर्ज या चित्रपटातील गाणे ऐकु येते. ते गाणं आहे एक हसीना थी... या सोबतच आपल्याला आगामी काळातील एक हसीना थी चित्रपटाची वेगळी झलक समोर येते. चित्रपटाच्या स्टोरीविषयी सांगायचे झाल्यास या भागात देखील तापसी पन्नु आणि विक्रांत मेस्सीची वेगळी कथा पाहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या टीझरमधून तापसी अन् विक्रांत मेस्सीची वेगळीच मिस्ट्री दिसून येत आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

केव्हा होणार प्रदर्शित?

फिर आई हसीन दिलरुबाच्या मेकर्सचं म्हणणं आहे की, आम्ही पुन्हा तुमचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहोत. त्याचा रोमांचक अध्याय सुरु होणार आहे. हसीन दिलरुबाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नव्या रुपात अन् ढंगात पुन्हा आम्ही प्रेक्षकांसमोर येणार आहोत.

हसीन दिलरुबा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जुलै २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये विक्रांत मेस्सी, तापसी पन्नु आणि अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्या भूमिका होत्या. आता नव्या चित्रपटाविषयी अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT