Katrina Kaif  sakal
मनोरंजन

Katrina Kaif : ‘फोन भूत’च्या हॉरर कॉमेडी ट्रेलरची झलक

कतरीना कैफ अल्पावधीतच सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कतरीना कैफ : अभिनेत्री कतरीना कैफ अनेक प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. तिने अल्पावधीतच सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिचा आगामी ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्यासह ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २ मिनिटे ४९ सेकंदाच्या ‘फोन भूत’च्या ट्रेलरमध्ये सिद्धांत आणि ईशान भूत पकडण्याचे काम करताना दिसतात. हे दोघे मॉडर्न तांत्रिकाच्या भूमिकेत आहेत.

त्यात त्यांना कतरिनाची साथ मिळते. चित्रपटात कतरिना भूताच्या रूपात दिसणार आहे. अशा वेळी सर्वजण घाबरवण्याऐवजी हसवतात. एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. कतरिनाला अन्य भूतांना मोक्षप्राप्तीसाठी मदत करायची असते.

यासाठी ती सिद्धांत-ईशानसह भूत पकडणारी टोळी बनवून एका अनोख्या प्रवासाला निघते. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन-जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ येत्या ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT