Phone Bhoot Trailer Katrina kaif Siddhant Chaturvedi Eshaan Khattar esakal
मनोरंजन

Phone Bhoot Trailer: फोन भूतचा ट्रेलर पाहून हसू आवरणार नाही...

नक्कीच पहा.. कतरिना कैफचा लग्नानंतरचा पहिल्या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

नुसतं भूत असं नावही काढलं तर भल्याभल्यांची बोलती बंद होते.काही जणांच्या तोंडून तर हनुमान चाळीसाचं निघते. भूताचे अनेक किस्सेही तुम्ही ऐकले असतील पण तुम्हाला जर हसवणार भूत दाखवलं तर.... बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी 'फोन भूत'या चित्रपटाच्या माध्यामातून तुम्हाला हे अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकतात प्रदर्शित झाला आहे.

भूताच्या भूमिकेत कतरिना कैफ तर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आता कतरिना कैफ सुंदर भूताच्या भूमिकेत असल्यावर या भूतला कोणी घाबरुच शकत नाही. २ मिनिटे ४९ सेकंदाच्या ट्रेलर पाहुन प्रेक्षक त्याच हसूच नियंत्रित करु शकणार नाही.

ट्रेलरची  सुरवात सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांनी केलेल्या अपघाताने होतो. ते भूताचाच अपघात करतात आणि नंतर त्यांना कळते की ते  भूताला पाहू शकतात.त्यानतंर त्याच्या आयुष्यात हॉट भूत कतरिना कैफची एंन्ट्री होते आणि ते भूत शोधण्याच्या मोहिमेवर निघतात. या तिघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उत्सुक आहेत.या तिघां व्यतरिक्त जॅकी श्रॉफ यांचा लूकदेखील चर्चेत आहे.

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शिन गुरमीत सिंग यांनी केले आहे. रविशंकरन-जसविंदर सिंग बाथ यांनी लिखान केले आहे.  फोन भूत ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopal Badne : मोठी बातमी ! फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिस ठाण्यात हजर, म्हणाला- मी प्रामाणिक...

भारताची नवी ‘फुलराणी’

Sunday Morning Breakfast Recipe: रविवारी सकाळच्या नाश्त्यात बनवा 'बटाटा मसाला पुरी', लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे राशिभविष्य - 26 ऑक्टोबर 2025

स्वागत नव्या पुस्तकांचे

SCROLL FOR NEXT