Piccolo movie marathi movie first poster cast pranav raorane ashwini kasar sakal
मनोरंजन

Piccolo movie: मराठी मालिकेतील 'हे' दोन प्रसिद्ध चेहरे झळकणार 'पिकोला' चित्रपटात..

संगीताचा सूर घेऊन पिकोलो प्रेक्षकांच्या भेटीला..

नीलेश अडसूळ

Piccolo movie: मराठी चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसताहेत. हीच बाब ध्यानात घेऊन फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

(Piccolo movie marathi movie first poster cast pranav raorane ashwini kasar)

आजच्या पिढीसमोर असणारे प्रश्न, त्यांना पेलावी लागणारी आव्हानं या साऱ्याचं चित्रण करत नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर संगीताच्या माध्यमातून अलगदपणे उलगडून सांगणारा ‘पिकोलो’ हा संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले.

प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे.

या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करणार आहे. येत्या २६ जानेवारीला ‘पिकोलो’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : २४ तासांच्या आत पुणे शहरात दोन गोळीबाराच्या घटना

SCROLL FOR NEXT