Pimple leaf artwork Jamgaon
Pimple leaf artwork Jamgaon sakal
मनोरंजन

पिंपळपानावरील कलाकृतीची अनेकांना भुरळ

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव : कुणाकडुन नृत्याविष्कार बघायला मिळतो, तर कुणाकडून कलाविष्कार... कुणी चित्रकलेची जोपासना करते तर कुणी हस्तेकलेत रमते... कुणी तांदळाच्या दाण्यावर नाव कोरते, तर कुणी वाळूमध्ये कलाकृती रेखाटते... सध्याच्या काळात कलाच माणसाला एक वेगळी ओळख निर्माण करून देते. हे अधोरेखित केले आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जामगाव (पा.) येथील चित्रकार महेश मस्के यांनी...

बार्शी (सोलापूर) तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील तरुण पिंपळाच्या पानावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारणारा अवलिया जामगावसारख्या छोट्याशा खेड्यात, शेतकरी कुटुंबात जन्मलेला चित्रकार महेश मस्के इतरांसाठी प्रेरणादायी आहे. जन्मत:च एका डोळ्याने अंध असलेल्या महेशच्या डोळस पेंटिंगने व पिंपळाच्या पानावरील कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली आहे. एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून जीवन जगताना अपंगत्वावर मात करीत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आजवर पाच हजाराहून अधिक चित्र रेखाटन, सरपंचापासून ते राज्यपालांपर्यंत सर्व ठिकाणी चित्र पोहोचले आहे. सात- आठ वर्षापासून महेश म्हस्के यांनी चित्रकलेला सुरवात केली. अनेक चित्र पेन्सिलच्या आधारे रेखाटली. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात आर्थिक मंदी आल्यामुळे चित्रकलेसाठी साहित्य उपलब्ध न झाल्याने विविध झाडांच्या पानावर कलाकृती निर्माण करण्याचा प्रयोग केला. त्यानंतर वड, नारळ, केळी, पिंपळ अशा अनेक पानांवर चित्र रेखाटन, वेगवेगळ्या पानावर पाचशेहून अधिक चित्र रेखाटन केलेले आहे.

महाराष्ट्राबाहेर इतर देशातही ही कलाकृती बहरलेली आहे. या कलाकृतीमधून सामाजिक संदेशाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चित्रांचे रेखाटन केलेले आहे. या पिंपळपानाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली आहे, असे चित्रकार महेश म्हस्के यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सध्या ‘लेक वाचवा- लेक शिकवा’ या उपक्रमावर आधारित चांदोरी (ता. निफाड) येथील गार्गी आहेर या लहान मुलीचे पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटन केले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे, कोविडकाळात उल्लेखनीय कामगिरी करणारे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचेही चित्र त्यांनी रेखाटले आहे.

रेखाटनासाठी लागणारे साहित्य

पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी कटर, सेलो टेप, पेपर पेन्सिल अन् पिंपळाचे पान या साहित्याचा वापर केला जातो. बार्शीचे चित्रकार महेश मस्के यांनी पिंपळाच्या पानावर कोरलेले छायाचित्र तयार केले. एका डोळ्याने दृष्टिहीन असूनही त्यांच्यातील ही कला वाखाणण्याजोगी आहे. आपली कला उत्कृष्टरित्या इतरांपुढे मांडून महाराष्ट्राला आपल्या कलेतून मोहून टाकणाऱ्या या चित्रकाराने दिव्यांगत्वावर मात करत कला आत्मसात केली, ही बाब विशेष आहे. त्यासाठी त्यांचे कौतूक वाटते.

- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

कला क्षेत्रातून बरेच काही घेण्यासारखे आहे. या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या संधी आहेत अन् तिच शोधण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यात आवड निर्माण होत गेली. अशाप्रकारे चित्रकला निसर्गतः विकसित होत गेली.

- महेश म्हस्के, चित्रकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT