Pipsi movies poster launched on social media 
मनोरंजन

'पिप्सी'चा रंजक प्रवास लवकरच...

सकाळवृत्तसेवा

लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होत असलेला 'पिप्सी' हा सिनेमा येत्या 27 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त बालकलाकार मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या छोट्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मुख्य पोस्टर लाँच करण्यात आला. या सिनेमाच्या पोस्टरवर ट्रेनच्या खिडकीतून दोन शाळकरी मुले बाहेर हात हलवताना दिसून येत असून, ही दोघेजण कुठल्यातरी प्रवासाला किंवा एखाद्या सहलीला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या पोस्टरवर 'अ बॉटल फूल ऑफ हॉप' ही टॅगलाईनदेखील दिली असल्याने, या दोन मुलांच्या आयुष्यात 'पिप्सी'ची ही बाटली कोणता आनंद घेऊन येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

'पिप्सी' चा हा पोस्टर लहान मुलांच्या भावविश्वाचा रंजक वेध घेणारा ठरत आहे. गावातल्या लहान मुलांच्या आवडत्या शीतपेयापैकी एक असलेल्या या 'पिप्सी' चा नेमका कोणता संदर्भ चित्रपटात मांडला आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर सिनेमा प्रदर्शनापर्यंत प्रेक्षकांना वाट बघावी लागणार आहे.  

विधि कासलीवाल यांची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या 'पिप्सी' या सिनेमात लहान मुलांच्या मानसिकतेचा आणि समाजातील समस्येकडे पाहण्याचा त्यांचा असलेला दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये लहानपणीच्या निरागस मैत्रीचा रंजक प्रवासदेखील प्रेक्षकांना घडून येणार असल्यामुळे, प्रत्येकांना हा सिनेमा आपल्या बालपणाची आठवणदेखील करून देणारा ठरणार आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT