Planet Marathi's Head Founder Akshay Bardapurkar Revealed many thing's about their political web series 'Mee Punha Yein'  Google
मनोरंजन

40 आमदारांची पळवापळवी,'मी पुन्हा येईन' सिनेमात आधीच कशी दिसली?,गौप्यस्फोट..

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

'प्लॅनेट मराठी' (Planet Marathi) हे मराठी वेबविश्वाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या हरहुन्नरी तरुण निर्माता अक्षय बर्दापूरकरचं(Akshay Bardapurkar) एक स्वप्न आहे. सकाळ Unplugged या आमच्या कार्यक्रमात अक्षयनं मराठी सिनेविश्व, त्याच्या 'गोष्ट एका पैठणीची', 'जून' सिनेमांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार, प्लॅनेट मराठी राजकारणावर आधारीत कथानकांच्या सिरीजच एकामागोमाग का बनवतेय याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. यामध्ये अक्षय बर्दापूरकर यांनी, महाराष्ट्रात खऱ्याखुऱ्या राजकारणात जो ४० आमदारांचा गेम झाला तो 'मी पुन्हा येईन'मध्ये अगदी तंतोतंत आधीच कसा शूट केला गेला याविषयी एक खुलासा केला आहे. तो जर जाणून घ्यायचा असेल तर या बातमीत पॉडकास्टची लिंक जोडलेली आहे,तेव्हा निर्माते अक्षय बर्दापूरकर यांची मुलाखत नक्की ऐका. (Planet Marathi's Head Founder Akshay Bardapurkar Revealed many thing's about their political web series 'Mee Punha Yein')

याच मुलाखतीत अक्षय बर्दापूरकर यांनी त्यांच्या गोष्ट एका पैठणीची, जून या सिनेमांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांसंदर्भातला देखील एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले आहेत, 'आमच्या सिनेमांना जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले तेव्हा दोन मिनिटं विश्वास बसला नाही कारण त्याआधी काही दिवसांपूर्वीच ....', आता अक्षय बर्दापूरकरांसोबत असं काय घडलं होतं पुरस्कार जाहीर होण्याआधी ज्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर विश्वास बसेना ते जाणून घेण्यासाठी ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका. तो देखील एक धमाल किस्सा आहे.

प्लॅनेट मराठीचे रानबाजार,त्यानंतर मी पुन्हा येईन,त्यानंतर आगामी राजीनामा हे सगळे एकापाठोपाठ एक येणारे सिनेमे राजकारणावर आधारित आहेत. हा राजकीय सिरीजचा सपाटा काय म्हणून प्लॅनेट मराठीनं लावला.तेव्हा बर्दापूरकरांनी दिलेलं उत्तर खोचक असलं तरी आताच्या राजकारणाला एकदम परफेक्ट सूट होत आहे. आता ते ऐकायला मात्र या बातमीत जोडलेली मुलाखतीची लिंक ओपन करुन आपल्याला नक्की ऐकावी लागेल. याच मुलाखतीत, मराठी सिनेमाकडे चांगला कॉन्टेंट आहे मग कुठे गणित अडतं, यावर देखील अक्षय बर्दापूरकर यांनी स्पष्ट मत मांडले आहे. तेव्हा प्लॅनेट मराठीचे मुख्य संचालक अक्षय बर्दापूरकर यांची ही पॉडकास्ट मुलाखत ऐकून राजकीय गुपितं समजून घेण्याची संधी मुळीच सोडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Accident News : हृदयद्रावक घटना! लोहोणेरजवळ मिक्सर गाडीखाली चिरडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

SCROLL FOR NEXT