planet marathi's sahela re web movie released on 1 october cast mrunal kulkarni sumeet raghvan subodh bhave
planet marathi's sahela re web movie released on 1 october cast mrunal kulkarni sumeet raghvan subodh bhave sakal
मनोरंजन

sahela re: मृणाल, सुमीत, सुबोध अशी दर्जेदार कास्ट घेऊन आलीय 'सहेला रे'

नीलेश अडसूळ

sahela re: अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' वेब-चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून काळाच्या विळख्याआड हरवून गेलेल्या 'ती' च्या अस्तित्वाला मैत्रीच्या हळुवार झुळकीने पुन्हा जिवंत करून, एक नवीन संजीवनी देणाऱ्या 'ती' च्या आयुष्याची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे 'सहेला रे'. मृणाल कुलकर्णी(mrunal kulkarni) , सुबोध भावे (subodh bhave)आणि सुमित राघवन (sumeet raghvan) यांच्या परिपक्व नात्यातील विविध छटा यात पाहायला मिळणार आहेत. दरम्यान या वेबचित्रपटातील 'रे मनाला' हे मनाला भिडणारे गाणेदेखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला आदर्श शिंदे यांचा बहारदार आवाज लाभला आहे. मनातील चलबिचल व्यक्त करणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत. तर सलील कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

(planet marathi's sahela re web movie released on 1 october cast mrunal kulkarni sumeet raghvan subodh bhave)

आयुष्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना गृहीत धरता धरता नात्यातील हरवून गेलेला गोडवा पुन्हा मिळवण्यासाठीची 'ती'ची धडपड ट्रेलरमधून दिसत आहे. या धडपडीत तिला तिचे अस्तित्व गवसेल का, याचे उत्तर 'सहेला रे' पाहिल्यावरच मिळेल.

चित्रपटाबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणतात, " काही अनुकूल परिस्थिमुळे आयुष्याच्या परिघापलीकडे लोटली गेलेली माणसे जेव्हा पुन्हा आयुष्यात परतात, तेव्हा होणारी मनाची चलबिचल एका क्षणात भूतकाळात नेऊन उभी करते आणि त्यातूनच मग तिला तिचा स्वतःचा शोध लागतो. नात्यातील परिपक्वता यात अधोरेखित करण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो वास्तववादी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी अशाच पद्धतीने नाही परंतु थोड्याफार प्रमाणात असे क्षण येतात. 'प्लॅनेट मराठी'च्या सोबतीने हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मला आशा आहे, 'सहेला रे' नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.''

'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " वैविध्यपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. अशीच एक संवेदनशील, परिपक्व नात्याची कथा असलेला 'सहेला रे' आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. उत्तम कलाकार, गायक, संगीतकार यांची संपूर्ण टीम एकत्र आल्यावर नक्कीच काहीतरी उत्कृष्ट घडणार. 'सहेला रे' सर्वांना निश्चितच आवडेल." अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी प्रस्तुत, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT