Prime Minister Narendra Modi Flew Tejas Fighter Jet Kangana Ranaut react  Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut On Pm Modi Rides: पंतप्रधानांची 'तेजस' भरारी! कंगना म्हणाली, "माझा 'तेजस' चित्रपट पाहिला असेल.."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस फायटर जेट उडवले यावर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut On Pm Modi Rides: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या कामासोबतच ते अनेक नवनवीन साहसी कृत्य करत असतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी बेंगळुरूमध्ये तेजस लढाऊ विमानाचे उड्डाण केले. पीएम मोदी बेंगळुरूच्या येलाहंका एअरबेसवर पोहोचले होते.

पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमधील HAL ला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याची पाहणी केली. तेजस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ते बनवले आहे. या सोबतच त्यांनी तेजस विमानामध्ये भरारी देखील घेतली.

फायटर जेट उडवल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'हा अनुभव अविश्वसनीय आणि समृद्ध करणारा होता, ज्यामुळे आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतेवर माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल माझ्यामध्ये अभिमान आणि आशावादाची भावना निर्माण झाली आहे.'

सध्या पंतप्रधानांचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता कंगना राणैतने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे फोटो शेयर केले आहे. या फोटोसोबत कंगना राणैतने तिच्या 'तेजस' या चित्रपटाबद्दलही चाहत्यांना माहिती दिली आहे.

कंगना आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आमच्या सैनिकांना समर्पित आणि भारत फायटर प्लेन तेजसवर बनवलेला आमचा तेजस चित्रपट पाहिला असेल अशी आशा आहे. तुमच्यापैकी ज्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात पाहिला नसेल त्यांना तो लवकरच @zee5 आणि @sonylivindia वर दिसणार आहे. सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटाने खुपच कमी कमाई केली. चित्रपटाने फक्त 5.15 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT